पंचायत समितीचे अधिकारी राजकीय दबावाखाली 

अनिल दंदी
गुरुवार, 26 जुलै 2018

अकोला : बाळापूर पंचायत समीती मध्ये राजकीय अराजक माजलेले असून तिथे कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, अशी बोंब आहे. विशेष म्हणजे पंचायत समितीत एका राजकीय पक्षाची  सत्ता असल्याने  याचा त्रास अधिकारी व कर्मचारी वर्गाला सहन करावा लागत असून पंचायत समिती कार्यालयातील कारभार पुर्णता ढेपाळला चालला आहे. 

पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी या दोन अधिकाऱ्यांवर विनयभंगाचे आरोप आहेत. त्यामुळे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणामुळे गटविकास अधिकारी रजेवर गेले होते. परिणामी पंचायत समितीत अधिकाऱ्यांची वानवा होती. दोन दिवसांपूर्वी गट विकास अधिकारी परतले आहेत. मात्र स्वतःला मोठे समजणारे एका मोठ्या पक्षाचे  जेमतेम कार्यकर्ते राजकारणाच्या आखाड्यात उतरले असून गटविकास अधिकाऱ्यांनी इथे रूजू होऊ नये यासाठी आंदोलन करणे सुरू केले आहे. 
अधिकाऱ्यांचे खच्चीकरण होत असल्याने बाळापूरात फार काळ अधिकारी टिकत नाहीत. याचा परिणाम विकास कामांवर होत आहे. 

या कार्यकर्त्यांना सामान्य जनतेच्या समस्या व गरजांची बिलकूल पर्वा नसल्याचे यावरुन सिद्ध होत आहे. विनयभंगाचा आरोप झाल्यानंतर एका संघटनेने गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनातील खुर्चीला चपलांचा हार घातला होता. हे सर्व कशासाठी आहे. या पासून जनता मात्र अनभिज्ञ आहे. 
राजकारणी नेते व राज्यकर्त्यांना  जनता नावाची काही चीज आहे, याचाही थांगपत्ता नसावा; अशी चर्चा तालुक्यात होत आहे. 

Web Title: officers of panchayat samiti are under political pressure