अभियांत्रिकीला जुनाच अभ्यासक्रम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अभियांत्रिकी शाखांचा अभ्यासक्रम 1 ऑगस्टपासून बदलण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, हा निर्णय बारगळला असून आता पुढच्या शैक्षणिक सत्रापासूनच अभ्यासक्रम बदलला जाणार आहे. प्राध्यापक, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी अभ्यासक्रम बदलाच्या निर्णयाला बगल देण्यात आली असल्याची माहिती आहे. आता बदलापूर्वीच नवा अभ्यासक्रम वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाणार आहे. शिवाय कार्यशाळांच्या माध्यमातून नवीन अभ्यासक्रमाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचविली जाणार आहे.

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अभियांत्रिकी शाखांचा अभ्यासक्रम 1 ऑगस्टपासून बदलण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, हा निर्णय बारगळला असून आता पुढच्या शैक्षणिक सत्रापासूनच अभ्यासक्रम बदलला जाणार आहे. प्राध्यापक, विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी अभ्यासक्रम बदलाच्या निर्णयाला बगल देण्यात आली असल्याची माहिती आहे. आता बदलापूर्वीच नवा अभ्यासक्रम वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाणार आहे. शिवाय कार्यशाळांच्या माध्यमातून नवीन अभ्यासक्रमाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचविली जाणार आहे. विद्यापीठाने अभ्यासक्रम बदलाचा निर्णय घेतला असला तरी त्यासाठी प्राध्यापकांकडून कोणतेही मत घेण्यात आले नव्हते. प्राध्यापकांनाही नवीन अभ्यासक्रमाची माहिती नव्हती. विद्यापीठ प्राधिकरणातही त्यावर एकमत होत नव्हते. ही बाब लक्षात घेत सिनेट सदस्य ऍड. मनमोहन वाजपेयी, डॉ. धनश्री बोरीकर यांनी मंगळवारी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. कुठलीही पूर्व तयारी नसताना अभ्यासक्रमात बदल केल्यास त्याचे गंभीर परिणाम होणार असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. त्यावर कुलगुरूंनी पुढच्या सत्रापासून पूर्ण तयारीनिशी अभ्यासक्रम बदलण्याची ग्वाही दिली.
वेबसाइटवर अभ्यासक्रम टाकणे गरजेचे
अखिल भारतीय तंत्र परिषद (एआईसीटीई) ने सुमारे दीड वर्षापूर्वीच अभियांत्रिकीचा नवा अभ्यासक्रम पाठवून लागू करण्याची सूचना केली होती. प्रारंभी बोर्ड ऑफ स्टडीज नसल्याने त्याला बगल दिली गेली. वेगवेगळ्या विषयांसाठी अभ्यासमंडळ तयार करून अभ्यासक्रम तयार करून बैठक, चर्चासत्र घेणे अपेक्षित होते. जून महिन्यात शिक्षण मंचातर्फे प्राचार्य डॉ. एस. आर. चौधरी यांच्या अध्यक्षतेत समिती तयार झाली. समितीने अभ्यासक्रम तयारही केले. पण, त्यावर बोर्ड ऑफ स्टडीजच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. नियमानुसार विद्यापीठाने 4 वर्षांचा अभ्यासक्रम वेबसाईटवर टाकणे क्रमप्राप्त आहे. पण, समितीला आतापर्यंत केवळ एकच वर्षाचा अभ्यासक्रम सार्वजनिक करता येऊ शकला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An old course in engineering