Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी ठार

शेतातील पीक परिस्थिती बघण्यासाठी गेलेल्या एका वृद्ध शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले
Old farmer killed in tiger attack forest department Vidarbha
Old farmer killed in tiger attack forest department Vidarbhasakal

मूल : शेतातील पीक परिस्थिती बघण्यासाठी गेलेल्या एका वृद्ध शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना मंगळवारी (ता. ११) सकाळी साडेसात वाजतादरम्यान तालुक्यातील चिरोली येथे घडली. मृत शेतकऱ्याचे नाव ऐवनाथ चुनारकर (वय ७०) असे आहे. चिरोली येथील ऐवनाथ चुनारकर हे शेती पाहण्यासाठी मंगळवारी सकाळी माठ नाल्याजवळ गेले होते. तेथेच दबा धरून बसलेल्या वाघाने ऐवनाथवर हल्ला केला. त्यात ते जागीच ठार झाले.

बराचवेळ लोटून चुनारकर घरी परतले नव्हते. त्यामुळे घरच्यांनी शेताकडे धाव घेतली. तेव्हा ऐवनाथ चुनारकर माठ नाल्याजवळ मृतावस्थेत आढळून आले. त्यानंतर घरच्यांनी याची माहिती वनविभाग, पोलिसांना दिली. माहिती मिळताच दोन्ही विभागांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वारंवार वाघाच्या होणाऱ्या हल्ल्यामुळे शेतकरी, नागरिक संतप्त झाले आहे. या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com