मेरे बाप पहले आप, पत्नी व तरुण मुलांना सोडून वृद्ध बापाने गाठले प्रेयसीचे गाव...

नीलेश झाडे
Wednesday, 27 May 2020

मोठ्या मुलाला वाटतं होत लग्नासाठी मुली शोधण्याच कार्य बाप प्रामाणिकपणे पार पाडीत आहे... मात्र, घडलं विपरित... सून शोधण्याचा वयात वृद्ध बापाने सावत्र आई शोधली... बापाची प्रेमगाथा घरापर्यंत पोहोचली... घरच्यांनी झालं ते झालं अशी समजूत काढली अन्‌ वाकड्या मार्गावरून सरडमार्गी पाऊल टाकण्याची सूचना केली... 

धाबा (जि. चंद्रपूर) : प्रेमाला वयाचे बंधन नसते असे म्हणतात... प्रेम कुणाला केव्हाही आणि कुणाशीही होऊ शकते... तरुण प्रेमात पडतात तसे म्हातारेही प्रेमात पडतात... प्रेमात खोड काढण्याचा प्रश्‍नच उरत नाही... का? तर प्रेम म्हणजे प्रेम असते... तुमचं आमचं सेम असते... आई व मुलांचं प्रेम जगा वेगळं असते... यात स्वार्थाला जागा नसते... म्हणूनच प्रेमाला नि:स्वार्थ म्हटले जाते... मात्र, एक बाप मुलांच्या लग्नाचे कर्तव्य पार पाडण्याचे सोडून प्रेमात पडला... प्रेमात पडला नाही तर तुडूंब बुडला... नंतर पुढील घटनाक्रम घडला... 

जिल्हा चंद्रपूर... तालुका गोंडपिपरी... येथील एका गावात 55 वर्षीय बुद्ध राहतात... या वृद्ध बापाला चार तरुण मुलं आणि पत्नी आहे... घरात तरुण मुलं... मुलांच वय लग्नाचं... बोहल्यावर चढायला मुले आतुर झाली होती... मुलांना वाटले यावर्षी बाप "कर्तव्य' निभावेल... मात्र, 55 वर्षीय प्रियकर बापाने स्व:ताचाच "जुगाड' लावला. पत्नी व मुलांना सोडून प्रियकर बापाने लॉकडाउनमध्ये सिमा पार करीत थेट गडचिरोली जिल्ह्यातील प्रेयसीचे गाव गाठले... 

जाणून घ्या - Video : शिवसैनिकांच्या संयमाचा बांध फुटला; मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांसोबत केले असं...

चार मुलाच्या बापाचे जीवन आनंदात जात होते... कारण, चारही मुलं कामाला लागले होते... त्यामुळे घरात आनंदी वातावरण होते... मुलं तरुण झाली... मोठ्या मुलाचा लग्नाचा विषय घरात सुरू झाला... मोठ्या मुलाला वाटतं होत लग्नासाठी मुली शोधण्याच कार्य बाप प्रामाणिकपणे पार पाडीत आहे... मात्र, घडलं विपरित... सून शोधण्याचा वयात वृद्ध बापाने सावत्र आई शोधली... बापाची प्रेमगाथा घरापर्यंत पोहोचली... घरच्यांनी झालं ते झालं अशी समजूत काढली अन्‌ वाकड्या मार्गावरून सरडमार्गी पाऊल टाकण्याची सूचना केली... 

मात्र, प्रियकर वृद्ध बाप प्रेयसीच्या प्रेमात तुडूंब बुडालेला होता... तिच्याशिवाय घरात बापाचा जीव करमेना... दिवस-रात्र तिच्याच आठवणीत जात होते... दुसरीकडे घरच्यांचा विरोध होता... प्रेयसीची ओढ असह्य झाल्याने शेवटी बापाने लॉकडाउनमध्येच गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या प्रेयसीचे गाव गाठले... सध्या तो प्रेयसीकडेच आहे... वैवाहिक जिवनाचे गोड स्वप्न बघणाऱ्या मुलाचा आधी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्याची बापाला सुटलेली घाई बघून "मेरे बाप पहले आप' म्हणण्याची वेळ पोरांवर ओढावली आहे.

क्लिक करा - वेळ रात्री अकराची... युवतीसोबत रस्त्यावर बोलत होता पोलिस कर्मचारी... मग काय झाले वाचा...

वृद्ध बाप प्रेयसीकडे

प्रेमात आकंठ बुडालेल्या वृद्ध बापाला प्रेयसीचीच आठवण येत होती... तो तिला भेटण्यासाठी कासाविसा झाला होता... तिला पाहण्यासाठी तडफडत होता... घरच्यांना ही गोष्ट माहिती असल्याने अडचण होती... तरीही वृद्ध प्रियकर बापाने लॉकडाउनचे निय तोडत प्रेयसीचे घर गाठले... जिल्ह्याची सीमा ओलांडून गडचिरोलीत प्रवेश केला... आता तो बृद्ध प्रियकर बाप प्रेयसीच्याच घरी असल्याचे समजते... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The old lover from Chandrapur district went to Gadchiroli district