Video : शिवसैनिकांच्या संयमाचा बांध फुटला; मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांसोबत केले असं...

तुषार अताकरे 
Tuesday, 26 May 2020

मंगळवारी सकाळी दहा वाजता दोघांच्याही दुकानांची तोडफोड करून सामान रस्त्यावर फेकले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याने शिवसैनिक चंगलेच संतप्त झाले आहे. पोस्ट करणाऱ्या दोघांच्या दुकानाची तोडफोड करून शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. 

वणी (जि. यवतमाळ) : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकणी वणीत दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. या पोस्ट प्रकणाचे तीव्र पडसाद सोमवारी वणीत उमटले. शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून त्यांच्या दुकानाची तोडफोड केली. त्यामुळे वणीसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

कोरोना आजाराने जगासह देशाला जेरीस आणले आहे. त्यातही महाराष्ट्रात रुग्णांची संख्या 50 हजारांवर पोहोचली आहे. अशात महाराष्ट्र सरकार कोरोना रोखण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला. निवेदने, काळे झंडे व फलक घेऊन सरकारचा निषेधही नोंदवित आहे. त्यामुळे चांगलेच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

जाणून घ्या - आमचा दररोजचा जीवाशी खेळ, मेल्यावर 50 लाख काय कामाचे, वाचा पोलिसांची व्यथा... 

राज्यात सुरू असलेले हे लोण आता गाव पातळीवर येऊन पोहोचले आहेत. शिवसेना व भाजप समर्थकांमध्ये सोशल मीडिया वॉर सुरू झाला आहे. वणी येथील वणी ग्रामीण समाचार या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर सतीश पिंपरे यांनी तर फेसबुकवर व्यावसायिक विवेक पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली. यामुळे शिवसैनिक चांगलेच संतापले. या दोघांविरुद्ध शिवसैनिकांनी पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद केला होता. 

मात्र, शिवसेनेचे माजी आमदार व विद्यमान जिल्हाप्रमुख विश्‍वास नांदेकर यांच्या नेतृत्वात मंगळवारी सकाळी दहा वाजता दोघांच्याही दुकानांची तोडफोड करून सामान रस्त्यावर फेकले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याने शिवसैनिक चंगलेच संतप्त झाले आहे. पोस्ट करणाऱ्या दोघांच्या दुकानाची तोडफोड करून शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

क्लिक करा - युवतीची काढली छेड अन्‌ रोड रोमियोला पडला चोप

संयमाचा बांध फुटला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार व कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबाबत येथील सतीश पिंपरे व व्यावसायिक विवेक पांडे यांनी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित केली होती. 24 मे रोजी या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला होता. यामुळे शिवसैनिक संतप्त झाले होते. दोघांनाही कठोर शिक्षा करण्याची मागणी केली होती. मात्र, अखेर शिवसैनिकांच्या सैय्यमाचा बांध फुटला. 

जोरदार घोषणाबाजी

माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर व शिवसैनिकानी मंगळवारी नांदेपेरा मार्गावर असलेल्या सतीश पिंपरे यांच्या रसवंतीवर पोहोचले व त्यांच्या दुकानातील सामानाची ताडफोड केली. तेथून त्यांनी आपला मोर्चा जटाशंकर चौकात असलेल्या विवेक पांडे यांच्या मोबाईल शॉपीकडे वळवला. जोरदार घोषणाबाजी करीत दुकानात फोडले. याची माहिती मिळताच ठाणेदार वैभव जाधव आपल्या सहकाऱ्यासोबत घटनास्थळी दाखल झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sainiks broke the shop of those who posted against the Chief Minister