बापरे! एकच शेत पाच जणांना विकले; लाखो रुपये लुबाडणाऱ्या वृद्धास पोलिस कोठडी 

Old man sold a farm to 5 different people in Amaravti
Old man sold a farm to 5 different people in Amaravti

अमरावती ः स्वत:च्या मालकीचे एक शेत पाच जणांना विकून ईसारचिठ्ठी करून त्यांच्याकडून लाखो रुपये घेतल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी संशयित आरोपी प्रदीप भीमराव रोंघे (वय 65, रा. धामणगावरेल्वे) यांना अटक केली.

जिल्हा न्यायालयाने संशयित आरोपीस सोमवारपर्यंत  (ता. 11) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. खापर्डे बगीचा येथील दीपक शामलाल रावलानी (वय 30) यांच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी 24 ऑगस्ट 2020 रोजी प्रदीप रोंघेविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता. 2018 ते 2020 या दोन वर्षाच्या कालावधीत ही घटना घडली. श्री. रोंघे यांचे विरुळ रोंघे गावात एक शेत आहे. ते शेत त्यांनी चार ते पाच जणांना विकले. 

त्यासाठी त्यांच्यासोबत ईसारचिठ्ठी सुद्धा केली. ज्यांच्यासोबत इसार झाला. त्यांच्याकडून लाखो रुपये घेतले. श्री. रावलानी यांच्यासोबत प्रदीप रोंघे यांनी पंचवीस लाखामध्ये गावातील शेत विक्रीचा व्यवहार केला. त्या शेताच्या अंतिम खरेदीचा व्यवहार हा वर्षभराच्या आत करण्याचे ठरले होते. रोंघे यांनी एकूण रकमेपैकी 13 लाख 43 हजार 89 रुपये एवढी रक्कम रावलानी यांच्याकडून घेतली होती. परंतु निर्धारित मुदतीत रोंघे यांनी खरेदी करून देण्याचे टाळले. पैसेही परत दिले नाही. आपली फसवणूक केल्याची तक्रार श्री. रावलानी यांनी कोतवाली ठाण्यात केली. प्रकरणी पोलिसांनी प्रदीप रोंघेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.  

फसवणूकीत वकिलाचाही समावेश

संशयित प्रदीप रोंघे याने केवळ सामान्य लोकांनाच शेत विकले नसून, एका वकीलासोबतही शेती विक्रीचा व्यवहार ठरवून इसार म्हणून त्यांच्याकडून 6 लाख रुपये घेतले होते. त्यापैकी काही रक्कम रोंघेनी वकिलास परत केली. उर्वरित रक्कम अद्यापही दिलेली नाही. 

पाचपैकी दोघांसोबत केलेल्या ईसारचिठ्ठीवर साक्षीदार म्हणून दोन प्रकरणात संशयित आरोपी रामसिंग वाघाजी चव्हाण (रा. सालोरा, चांदुररेल्वे) याची स्वाक्षरी आहे. त्यामुळे चव्हाणविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.  
- एस. सी. सोनोने, 
सहाय्यक पोलिस निरीक्षक, शहर कोतवाली ठाणे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com