मुलांच्या भांडणाचा राग; पिता-पुत्राने केली भाल्याने वृद्धाची हत्या ​

An old man was killed by a father and son with a spear in Amravati
An old man was killed by a father and son with a spear in Amravati

अमरावती : वर्षभरापूर्वी झालेल्या वादाचा वचपा काढण्याच्या हेतूने पिता-पुत्राने भाल्याने भोसकून वृद्धाचा खून केला. शुक्रवारी (ता. सात) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दर्यापूर तालुक्यातील हिंगणी मिर्झापुर येथे ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमराव सोळंके (वय ६८, रा. हिंणगी मिर्झापूर) असे मृत वृद्धाचे नाव आहे. दर्यापूर पोलिसांनी विजय रघुनाथ तायडे (वय ४०) व रघुनाथ बहाद्दुर तायडे (वय ६८, दोघेही रा. हिंणगी मिर्झापूर) या दोघांविरुद्ध खुनाचा दाखल केला आहे. वर्षभरापूर्वी विजयच्या बहिणीचे उत्तमराव सोळंके यांच्या मुलासोबत शिवीगाळ केल्याप्रकरणी भांडण झाले होते. तेव्हा गुन्हाही दाखल झाला होता.

त्याच वादातून वर्षभरापासून एकाच गावात राहणाऱ्या रघुनाथ तायडे व उत्तमराव सोळंके यांच्या कुटुंबात वाद सुरूच आहे. शुक्रवारी (ता. सात) जुन्याच वादावरून पुन्हा त्यांच्यात भांडण झाले. एकमेकांना शिवीगाळही केली. रागाच्या भरात विजय तायडे याने जवळच्या भाल्याने वार करून उत्तम सोळंके यांना गंभीर जखमी केले.

जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यन सोळंके यांचा मृत्यू झाला. रत्ना उत्तम सोळंके (वय ६०) यांच्या तक्रारीवरून दर्यापूर पोलिसांनी तायडे पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना रात्रीच अटक झाली. असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

शस्त्र् केले जप्त
जुन्या वैमनस्यातून झालेली शिवीगाळ व आलेला राग अनावर झाल्याने हा खून झाला. या व्यतिरिक्त दुसरी पार्श्वभूमी नाही. ज्या शस्त्राने वार केला ते जप्त व्हायचे आहे.
- तपन कोल्हे,
पोलिस निरीक्षक, दर्यापूर ठाणे

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com