दीड तास उशिरा मिळाली प्रश्नपत्रिका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मार्च 2019

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका मंगळवारी जनसंवाद विभागाच्या पहिल्या सत्रातील परीक्षार्थ्यांना बसला. तब्बल दीड तास उशिराने प्रश्‍नपत्रिका दिल्यानंतर पेपर सोडवण्यासाठी तीन तासांचा वेळ दिला नसल्याने विद्यार्थ्यांनी गोंधळ घालून रोष व्यक्त केला.

डॉ. मधुकरराव वासनिक पीडब्ल्यूएस आर्टस ऍण्ड कॉमर्स महाविद्यालय केंद्रावर दुपारी अडीच ते साडेपाच या वेळेत "प्रिन्सिपल ऑफ मास कम्युनिकेशन' पेपर होता. परीक्षार्थी वेळेत पोहोचले. मात्र, विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकांसाठी तब्बल दीड तास वाट बघावी लागली. काही परीक्षार्थ्यांचे मराठी माध्यम असल्याने त्या विद्यार्थ्यांना तब्बल पावणेदोन तास वाट बघावी लागली. परीक्षेचा कालावधी तीन तास असल्याने विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका दिल्यापासून पुढचा अवधी देणे अपेक्षित होते. मात्र, वर्गातील शिक्षिकेने साडेपाचला उत्तरपत्रिका गोळा करण्याचे आदेश दिले. त्यामुळे विद्यार्थी चांगलेच भडकले. याची तक्रार आपण विद्यापीठ प्रशासनाला करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
घरी जायचे आहे
उत्तरपत्रिका सोडवण्यासाठी पुरेसा वेळ देण्याचा आग्रह संबंधित शिक्षिकेकडे केला. मात्र, तिने लहान मुलं आहेत, घरी लवकर जायचे आहे, असे कारण सांगून पेपर गोळा केले.
परीक्षा केंद्रावर असणाऱ्या प्रमुखांमुळे हा सर्व गोंधळ झाल्याचे प्रथमदर्शिनी लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांना त्वरित कारणे दाखवा नोटीस बजावणार असून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
-डॉ. नीरज खटी
संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One and a half hour passed question papers