अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 एप्रिल 2018

नागपूर - दहावीची परीक्षा आटोपून घरी परतत असलेल्या विद्यार्थिनीला सोडून देण्याच्या बहाण्याने आरोपी अजहर ऊर्फ अरमान समसूल अंसारी (24, रा. चैतन्येश्‍वरनगर, खरबी) याने स्वत:च्या घरी नेले व पाशवी अत्याचार केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यापासून तो पसार होता. नंदनवन पोलिसांनी आरोपीचा शोध घेत शिताफीने बेड्या ठोकल्या. 

पीडित दहावीची विद्यार्थिनी असून, तिची आरोपीसोबत जुनी ओळख आहे. 8 मार्च रोजी तिचा शेवटचा पेपर होता. परीक्षा आटोपून पायी घरी परतत असताना आरोपीने तिला बघितले. घरी सोडून देण्याच्या बहाण्याने गाडीवर बसविले. आपल्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. विरोध केला असता गालावर थापड लगावली. कोणालाही सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. भीतीपोटी मुलगी पाच दिवस गप्प राहिली. मात्र, एक दिवस तिने हिंमत करून कुटुंबीयांना प्रकाराची माहिती दिली. यानंतर नंदनवन ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिस मागावर असल्याची माहिती मिळताच आरोपी पसार झाला. 

मुंबई, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, नांदेड, छत्तीसगढ अशी एकामागून ठिकाण बदलवित त्याने अटक टाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याच्या संबंधातील व्यक्तीला ताब्यात घेतले. तांत्रिक पद्धतीने तो थांबून असलेल्या ठिकाणाची माहिती घेतली. त्याआधारे शुक्रवारी नंदनवन पोलिसांच्या पथकाने बिलासपूर येथून आरोपीला जेरबंद केले. 

Web Title: one arrested in nagpur