अखेर १२ वर्षांपासूनच्या लढ्याला यश, धारवाड प्रकल्पग्रस्तांना एक कोटी ६८ लाख अनुदान मंजूर

one crore 68 lakh grant sanctioned to dharwad project affected people in amravati
one crore 68 lakh grant sanctioned to dharwad project affected people in amravati

अमरावती : तिवसा तालुक्‍यातील धारवाड येथील वर्धा प्रकल्पबाधितांना एक कोटी 68 लाख 75 हजार रुपयांचे पुनर्वसन अनुदान मंजूर झाले आहे. यासाठी तब्बल १२ वर्षांपासून लढा सुरू होता. आज त्या लढ्याला यश आले आहे. 

धारवाडा येथील 171 भूधारकांच्या निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडित क्षेत्रासाठी भूसंपादन करण्यात आले आहे. ज्यांची शेतजमीन किंवा गावठाणातील घरे सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित करण्यात आली असतील अशा बाधितांना पुनर्वसन अनुदान देण्यात येते. धारवाडा येथील 148 प्रकल्प बाधितांना पुनर्वसन अनुदान मिळावे, अशी मागणी सातत्याने 2012 पासून करण्यात येत होती. तसा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्याला यश प्राप्त झाले असून शासननिर्णयानुसार धारवाडा येथील प्रकरणात अंतिम निवाडा घोषित करण्यात आला आहे. या निवाड्यानुसार 148 प्रकल्पबाधितांना पुनर्वसन अनुदान मिळणार आहे. पुनर्वसन अनुदानाची रक्कम  निम्नवर्धा प्रकल्प, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांना पुरविण्यात येणार आहे. त्यांच्याकडून संबंधितांना अदा करण्यात येईल.

कामांना गती द्यावी -
प्रकल्पबाधितांना आता न्याय मिळाला असून दीर्घकाळापासून त्यांची असलेली मागणी मान्य झाली आहे. मागणीनुसार पुनर्वसनाच्या विविध कामांना गती देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com