esakal | ३५०० ब्रास जप्त वाळूसाठ्यांचा लिलाव, आतापर्यंतची मोठी कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

sand

३५०० ब्रास जप्त वाळूसाठ्यांचा लिलाव, आतापर्यंतची मोठी कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात वाळूमाफियांनी साठा जप्त करून ठेवला होता. या साठ्यावर तहसील प्रशासनाने कारवाई करीत मोठा वाळूसाठा (sand seized yavatmal) जप्त केला. त्यातील तीन हजार 647 ब्रास वाळूचा लिलाव एक कोटी रुपयांत करण्यात आला आहे. (one crore rupees sand seized in yavatmal)

हेही वाचा: पेट्रोल-डिझेलला पर्याय : गवतापासून जैविक इंधन प्रकल्पाची मुहूर्तमेढ

पावसाळ्यापूर्वी शहरातील अनेक भागांत वाळूतस्करांनी वाळूचे मोठमोठे साठे तयार केले होते. शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातही साठ्यांची संख्या मोठी होती. या साठ्यावर तहसील प्रशासनाने धडक कारवाई केली. आतापर्यंतचा सर्वांत मोठा साठा प्रशासनाने जप्त केला. शहर व लगतच्या परिसरातील 66 साठे जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या या वाळूसाठ्यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुल्यमापन करण्यात आले. खणिकर्म विभागाने लिलावासाठी प्रतिब्रास दोन हजार 596 ऑफसेट प्राईज निश्‍चित केली. 66पैकी 19 साठ्यांचा लिलाव करण्यात आला. त्यातून तहसील प्रशासनाला एक कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. सध्या तीन हजार 647 ब्रासचा लिलाव झाला आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात साठा आहे. सर्व लिलावातून शासनाला तब्बल अडीच ते तीन कोटी रुपयांचा महसूल जमा होण्याची शक्यता आहे. तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी या वाळूसाठ्यावर केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे. त्यामुळे अनेक साठे जप्त करून त्यातून महसूल मिळत आहे.

16 हजार ब्रास वाळूसाठा जप्त -

अवैध वाळूसाठ्यांवर तहसील प्रशासनाने कारवाई केली. यवतमाळ शहरात 16 हजारांपेक्षा जास्त ब्रास वाळूसाठा जप्त केला होता. बाजारमूल्यानुसार वाळूची रक्कम साडेचार कोटी रुपयांच्या घरात आहे. तहसील प्रशासनाने कारवाई करीत वाळूसाठा जप्त केला. त्यानंतर आता महसूल प्रशासनाने जवळपास एक कोटी रुपयांचा साठ्यांचा लिलाव केला. तहसील प्रशासनाला वाळूसाठ्यांच्या लिलावातून मिळालेली आतापर्यंतची ही सर्वांत मोठी रक्कम आहे.

loading image