अकोला : बॅण्ड पथकाच्या वाहनाला अपघात; एक ठार 

Akola
Akola

बाळापूर, (अकोला) : खामगाव येथे विवाह समारंभासाठी जाणाऱ्या बॅण्ड पार्टी पथकाच्या वाहनावर पाठीमागून येणारा भरधाव ट्रक आदळून झालेल्या अपघातात पथकाचा वाहन चालक जागीच ठार झाला, तर अन्य तेरा वाजंत्री जखमी झाले आहेत. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर आज रविवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास बाळापूर जवळ भिकूंड नदीच्या पुलावर घडली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग मदत केन्द्र व बाळापूर पोलीस घटनास्थळी पोहोचत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले. 

मिळालेल्या माहितीनुसार अकोट येथील ताज बॅण्ड पार्टीचे वाहन क्रमांक (एमएच २८ ए ९१८०) हे पथकासह अकोल्याहून खामगाव येथे सकाळी जात होते. सदर वाहन आज पहाटे सहा वाजता बाळापूर जवळ भिकूंड नदीच्या पुलावर पोचताच पाठीमागून येणाऱ्या (युपी ७० एफ टी ९०२१) या क्रमांकाच्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे बॅण्ड पार्टीचे वाहन उलटल्याने चालक त्याखाली दबल्याने त्याचा घटनास्थळी मृत्यू झाला. शे वहीत वय अंदाजे (३७) रा. अकोट, असे मृताचे नाव आहे. तर वाहनातील तेरा वाजंत्री जखमी झाले. 

अपघाताची माहिती मिळताच बाळापूर ठाणेदार गजानन शेळके व पोलिस ताफा तसेच पोलिस मदत केन्द्राचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. व जखमींना तातडीने १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेद्वारे सर्वोपचार मध्ये रवाना केले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

वाजंत्रांची मोठी हानी 
बॅण्ड पार्टीचे वाहन उलटल्याने वाहनासह त्यामधील म्युझिकल साहीत्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्व साहीत्य महामार्गावर विखुरले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com