कार अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

-  कार अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी
- गडचिरोलीतील एटापल्लीतील घटना

एटापल्ली : एटापल्ली येथून अहेरीकड़े जाणाऱ्या भरधाव कारच्या अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी आहे.

सदर अपघात (ता.25) गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान एटापल्ली पासून 2 की. मि. अंतरावर पंदेवाही टोला जवळ MH 02 CD 8523 क्रमांकाच्या कार झाडाला धड़कून फरफटत गेली. यात एक अनोळखी कारचालक व त्यांचा सहकारी बैंक ऑफ इंडियाचा कर्मचारी किरण सदाशिव करमे (वय 32 वर्ष) जखमी झाले.

त्यांना नागरिकांनी लागलीच ग्रामीण रुग्णालय उपचारासाठी दाखल केले. मात्र कारचालक यांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला तर गंभीर जखमी किरण करमे यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे हलविण्यात आले
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One dead and one serious injuried in a car accident

टॅग्स