esakal | जागतिक एड्स दिवस : प्रथमच घटला एचआयव्हीग्रस्तांचा आकडा, यंदा ३९० पॉझिटिव्ह रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

390 people found HIV positive in 2019 to 2020 at amravati

मार्चपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आले. त्यानंतर एआरटी सेंटर बंद होते. तसेच संशयित रुग्णांची चाचणी घेण्याचे दुसरे कुठलेही साधन उपलब्ध नव्हते. वाहतुकीची समस्या सुद्धा होती. मार्च ते ऑगस्टपर्यंत एचआयव्हीची चाचणी अतिशय नगण्य प्रमाणात झाली.

जागतिक एड्स दिवस : प्रथमच घटला एचआयव्हीग्रस्तांचा आकडा, यंदा ३९० पॉझिटिव्ह रुग्ण

sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती : कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे संपूर्ण जग हैराण झालेले असताना एचआयव्हीग्रस्तांच्या संख्येत मात्र घट नोंदविण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्याचा विचार करता मागील 13 वर्षांत एचआयव्हीग्रस्तांची आकडेवारी यंदा घटलेली आहे. लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे चाचण्या झाल्याच नाहीत. त्याचा परिणाम म्हणून ही आकडेवारी असल्याचे अधिकारी सांगतात. 

हेही वाचा - अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान, ३५ हजार मतदार...

मार्चपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आले. त्यानंतर एआरटी सेंटर बंद होते. तसेच संशयित रुग्णांची चाचणी घेण्याचे दुसरे कुठलेही साधन उपलब्ध नव्हते. वाहतुकीची समस्या सुद्धा होती. मार्च ते ऑगस्टपर्यंत एचआयव्हीची चाचणी अतिशय नगण्य प्रमाणात झाली. आता कुठे सप्टेंबरपासून चाचणीला वेग आल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांनी सांगितले. यंदा आतापर्यंत 390 पॉझिटिव्ह केसेस नोंदविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे लॉकडाउनच्या काळात सुद्धा एचआयव्हीग्रस्तांची आबाळ होऊ नये, यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, एआरटी सेंटरच्या चमूने रुग्णांना घरपोच औषधोपचाराची व्यवस्था केली होती.  

हेही वाचा - नागपूर पदवीधर निवडणूक : भाजप मतदारसंघ राखणार की...

अशी आहे आकडेवारी -

 • 2007-08  :  543
 • 2008-09  :  560
 • 2009-10 : 610
 • 2010-11 : 741
 • 2011-12 : 685
 • 2012-13 : 741
 • 2013-14 : 457
 • 2014-15 : 442
 • 2015-16 : 390
 • 2016-17 : 381
 • 2017-18 : 388
 • 2018-19 : 328
 • 2019-20 : 390

हेही वाचा - 'बाबां'चे समाधीस्थळ असलेल्या स्मृतीवनात डॉ....

यंदा कोरोनामुळे चाचण्यांचे प्रमाण नगण्य होते. देहविक्री करणाऱ्या महिलांचे चाचणी शिबिर आयोजित झाले नाहीत. परिणामी कोरोनाच्या उद्रेकापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत चाचण्या अतिशय नगण्य प्रमाणात झाल्या. त्यामुळेच एचआयव्हीग्रस्तांच्या संख्येत काहीशी घट आलेली दिसून येते.
- अजय साखरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी. 
 

loading image
go to top