esakal | हैदराबाद नागपूर महामार्गावर ट्रकची चारचाकीला धडक; एकाचा मृत्यू, १० जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

accident

समुद्रपूरमध्ये ट्रकची चारचाकीला धडक; एकाचा मृत्यू, १० जखमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

समुद्रपूर (वर्धा) : हैदराबाद-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर (hyderabad nagpur highway) मध्यरात्रीच्या सुमारास जाम चौकात ट्रकने क्रुझरला जबर धडक दिली. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. (one died and 10 injured in accident at samudrapur of wardha)

हेही वाचा: नाना पटोले यांचा दिग्रसमध्ये किल्लेदार कोण?

चारचाकी प्रवासी घेऊन हैदराबादवरून समुद्रपूरमार्गे छत्तीसगडला जात होती. यावेळी जाम चौकात नागपूरहून येणाऱ्या अज्ञात ट्रक चालकाने चारचाकीला धडक दिली. यामध्ये चारचाकी तीनवेळा पलटी झाली. घटनेची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुधाकर कुमरे, किशोर येरणे घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर रामू कलाल निषाद (४०), बिरबल धलवु शाहू (३३), नरेश कुमार, भानुराम करनेल (४०), अंजली जयराम पटेल (२५), नीता नरेश करसेल (३०), जानकीबाई पुनम शाहू (५०), रीमा निरव पटेल (२५), उमेश नरेश करशील (१०), जयराम पटेल (५), भूमिका जयराम पाटील (४ वर्ष), आशु निरोत्तम पटेल (२ वर्ष)आणि चालक किसन चन्द्रकुमार यादव (२३) वर्ष हे सर्व राहणार रामपूर जिल्हा रांजणगाव छत्तीसगड येथील असून सर्वांना समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान गंभीर जखमी असलेला राम निशादचा मृत्यू झाला. तसेच अपघातग्रस्त गाडी बाजूला उचलून वाहतूक सुरळीत करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास समुद्रपूर पोलिस करीत आहे.

loading image