esakal | क्षुल्लक कारणावरून दोघांवर हल्ला; मुलगा ठार, तर वडील गंभीर
sakal

बोलून बातमी शोधा

crime

क्षुल्लक कारणावरून दोघांवर हल्ला; मुलगा ठार, तर वडील गंभीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लाखनी (जि. भंडारा) : क्षुल्लक कारणावरून गावातील एक विधीसंघर्षग्रस्त बालकाने अश्लील शिवीगाळ करीत एक व्यक्तीला काठीने मारून जखमी केले, तर त्यांच्या मुलाच्या डोक्यावर काठीने वार केला. यात मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना दैतमांगली गावात रविवारी घडली. लाखनी पोलिसांनी विधीसंघर्षग्रस्त बालकावर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: 'नागरिकांनो! RTPCR चाचणी निगेटिव्ह आल्यास पाचव्या दिवशी करा HRCT'

दैतमांगली गावातील एक विधीसंघर्षग्रस्त बालक भोजराम शेंडे यांच्या घरासमोर येऊन त्यांच्या मुलाला शिवीगाळ करीत तू बाहेर निघ असे बोलला. त्यावरून वडील भोजराम मोळकु शेंडे (वय ७१) यांनी घराबाहेर येऊन विनाकारण कशाला माझ्या मुलाला शिवीगाळ करतोस असे म्हटले असता विधीसंघर्षग्रस्त बालकाने भोजराम शेंडे यांच्या उजव्या हात व पायावर काठीने मारहाण करून जखमी केले. भोजराम शेंडे यांचा नातू अंकित शेंडे याने भोजराम शेंडे यांना मोटारसायकलवर बसवून दवाखान्यात जात असताना मागे बसलेले मुलगा नंदू भोजराम शेंडे (वय ३८) यांच्या डोक्यावर हातातील काठीने मारले. तेव्हा नंदू शेंडे गाडीवरून खाली पडून बेशुद्ध झाले. गावातील नागरिकांच्या मदतीने जखमींना ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात नंदू शेंडे यांचा आज, रविवारी मृत्यू झाला. राम शेंडे यांच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी विधीसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

loading image