नातेवाईकांच्या घरी येऊन सरपणासाठी गेले जंगलात; झुडपात वाघ दिसला अन् सर्वच संपलं

one died in tiger attack in saoli of chandrapur
one died in tiger attack in saoli of chandrapur

सावली (जि. चंद्रपूर) : जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या वृद्धावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना बुधवारी (ता. 10) घडली. दादाजी पांडुरंग मस्के (वय 65) असे मृताचे नाव आहे. ही घटना पाथरी बिटातील कक्ष क्रमांक 1679 परिसरात घडली. 

मृत पांडुरंग मस्के हे डोंगरगाव येथील रहिवासी आहे. ते करगाव येथे आपल्या नातेवाईकांच्या घरी आले होते. ते पाथरी बिटातील कक्ष क्रंमांक 1679 मध्ये नातेवाईकांसोबत सरपण गोळा करण्यासाठी गेले होते. तेव्हाच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला करून दादाजी मस्के यांना ठार केले. गॅसचे भाव वाढल्याने नागरिक पुन्हा जंगलात सरपणासाठी जात आहेत. आज घडलेल्या घटनेमुळे नागरिकात दहशतीचे वातावरण पसरलेले आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृताच्या परिवाराला 25 हजारांची आर्थिक मदत दिली. यावेळी पाथरी येथील क्षेत्रसहायक कोडापे, विशाखा शेंडे, कल्याणी पाल, राकेश चौधरी यांची उपस्थिती होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com