esakal | अकोल्यात एकाचा मृत्यू; पाच रुग्ण नव्याने पॉझिटिव्ह

बोलून बातमी शोधा

One dies in Akola; Five patients were newly positive

संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात सुद्धा कोरोनाची दहशत वाढत चालली आहे. महानगर, शहरानंतर ग्रामीण भागात पोहोचलेल्या कोरोना संसर्गाचे पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यासोबतच 65 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 159 झाली असून ॲक्टिव रुग्णसंख्या 131 झाली आहे.

अकोल्यात एकाचा मृत्यू; पाच रुग्ण नव्याने पॉझिटिव्ह
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यात सुद्धा कोरोनाची दहशत वाढत चालली आहे. महानगर, शहरानंतर ग्रामीण भागात पोहोचलेल्या कोरोना संसर्गाचे पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.

त्यासोबतच 65 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 159 झाली असून ॲक्टिव रुग्णसंख्या 131 झाली आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोमवारी (ता. 11) सायंकाळपर्यंत कोरोना संसर्ग तपासणीचे 95 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 90 अहवाल निगेटिव्ह आले असून पाच अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यासोबतच सोमवारी उपचारादरम्यान एका 65 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. सदर रुग्ण 2 मे रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल झाला होता. तो बैदपुरा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 159 झाली असून 131 रुग्ण हे सद्यस्थितीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहेत.

वेगवेगळ्या परिसरात आढळले रुग्ण
सोमवारी (ता. 11) प्राप्त 95 पैकी 5 अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. सदर पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 55 वर्षीय व्यक्तीचा सहभाग असून ते मोठी उमरी परिसरातील रहिवासी आहेत तर दुसरा पॉझिटिव्ह रुग्ण हा जुने शहरातील किल्ला चौक परिसरातील रहिवासी आहे. पॉझिटिव्ह आढळलेला तिसरा रुग्ण हा 26 वर्षीय युवक असून बस बसस्थानकाच्या मागील आंबेडकर नगर परिसरातील रहिवासी आहे. चौथा रुग्ण 65 वर्षीय महिला असून अगरवेस जुने शहर परिसरातील रहिवासी आहे व पाचवा अकोट फाइल भागातील रहिवासी आहे. त्यामुळे नव्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला भाग सील करण्याची कार्यवाही प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे.

अशी आहे जिल्ह्याची स्थिती
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण -  159
मृत - 14 (1 आत्महत्या)
अॅक्टिव्ह रुग्ण - 131