कार अपघातात एक ठार; तिघे जखमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

राजुरा (जि. चंद्रपूर) : कार चालवीत असताना डोळा लागला. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन झाडावर आदळले. या अपघातात एक ठार, तर तिघे जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. 23) पहाटे दोन वाजताच्या सुमारास आर्वी गावाजवळ घडली. सुधाकर लांडे (वय 48) असे मृताचे नाव आहे. जखमींत वैभव लांडे, रोहित जामदार आणि पिंपळशेंडे यांचा समावेश आहे.

सुधाकर लांडे हे वेकोलित कामगार होते. मुलगा वैभव याचा शिक्षणासाठी नांदेड येथे नंबर लागला होता. त्यामुळे सुधाकर लांडे हे आपल्या कारने मुलगा वैभव, रोहित जामदार आणि चुनाळा येथील पिंपळशेंडे हे नांदेडला गेले होते. सोमवारी त्यांनी नांदेडचे काम केले. त्यानंतर रात्री जेवण करून ते राजुरा येथे येण्यासाठी निघाले होते. वाहन वैभव चालवीत होता. राजुरा शहरालगत असलेल्या आर्वी-कापणगावजवळ वैभवची डुलकी लागली. त्यामुळे वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळले. यात सुधाकर लांडे यांचा जागीच मृत्यू झाला. वैभव लांडे, रोहित जामदार आणि पिंपळशेंडे जखमी झाले. जखमींना चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One killed in car accident; All three were injured