भांडणात चाकूने वार केल्यामुळे एकाचा मृत्यू

 राजेश सोळंकी
शुक्रवार, 30 मार्च 2018

आर्वी - तालुक्यातील वर्धा मनेरी येथील निरंकार कोटेक्स येथे बाहेरगावाहून कामानिमित्त आलेल्या मजुरांमध्ये झालेल्या भांडणात एकाचा चाकूने भोसकून खुन करण्यात आला. ही घटना गुरुवारी (ता २८)रात्री घडली पोलिसांनी आरोपीला अटक केली असुन, शुक्रवारी (ता २९) पोलिसांनी तपास पंचनामा केला आहे. सुरज द्यानसिंग भिल्ल (वय २५) राहणार बऱ्हाणपूर खून झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. सुरज नवलसिंग सोलंकी (वय २१) रा बसला खापरा ता नेपाळनगर जि बऱ्हाणपूर असे आरोपीचे नाव आहे. 

तळेगाव पोलिस ठाण्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, सुरज भिल्ल आपल्या परिवारासोबत निरंकार कोटेक्स येथे कामानिमित्त आला होता. त्याच्या सोबत त्याचा चुलत भाऊ देखील होता. घटनेच्या तीन दिवस आधी सुरजचा चुलत भाऊ हा येथील सुरज सोलंकी या मजुराच्या बहीणीच्या खोलित रात्रीच्यावेळी गेला. तिने आरडाओरड केल्यानंतर सगळ्यांना जाग आली. सुजच्या भावाच्या या कृत्यामुळे सुरज भिल्ल आणि सुरज सोलंकी यांच्यात वाद होऊन मोठे भांडण झाले. हे भांडण सामंज्यस्याने सोडविण्यात आले होते. परंतु, गुरुवारी (ता.२८) पुन्हा त्या घटनेचा वचपा काढण्याच्या उद्देशाने सुरज सोलंकीने सुरज भिल्लच्या भावाला मारहाण केली. त्याच्यात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या सुरज भिल्लवर सोलंकीने चाकूने मांडीवर वार केले. यामध्ये जास्त रक्तस्त्राव झाल्याने सुरड भिल्लला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. तळेगाव पोलीसानी सोलंकीला अटक केली असून, पुढील तपास सुरु आहे.

Web Title: One killed due to knife murder