दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू

वडसा वनविभागाअंतर्गत पोर्ला वनपरिक्षेत्रातील नियत क्षेत्र साखरामधील काटली गावाच्या तलावाजवळ नर वाघाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. ५) सायंकाळी वनविभागाच्या निदर्शनास आली.
tiger fighting
tiger fightingsakal
Summary

वडसा वनविभागाअंतर्गत पोर्ला वनपरिक्षेत्रातील नियत क्षेत्र साखरामधील काटली गावाच्या तलावाजवळ नर वाघाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. ५) सायंकाळी वनविभागाच्या निदर्शनास आली.

गडचिरोली : वडसा वनविभागाअंतर्गत पोर्ला वनपरिक्षेत्रातील नियत क्षेत्र साखरामधील काटली गावाच्या तलावाजवळ नर वाघाचा मृत्यू (Tiger Death) झाल्याची घटना बुधवारी (ता. ५) सायंकाळी वनविभागाच्या निदर्शनास आली. पूर्ण पाहणी व उत्तरीय तपासणीदरम्यान आढळून आलेल्या पुराव्यावरून या वाघाचा मृत्यू दुसऱ्या वाघाशी झालेल्या झुंजीमुळेच (Fight) झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

वाघाच्या मृत्यूची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, क्षेत्रीय कर्मचारी तसेच मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प, चंद्रपूर डॉ. रविकांत खोब्रागडे व एनटीसीए (राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाचे प्रतिनिधी) म्हणून देवानंद दुमाने तत्काळ घटनास्थळी उपस्थित झाले. राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या (मार्गदर्शक तत्त्वांनुसार) घटनास्थळाच्या आजूबाजूस ५०० मीटर परिसरातील संपूर्ण क्षेत्र पुरावा शोधण्याकरिता तपासून पाहण्यात आले. प्राथमिक तपासणीवरून या वाघाचा मृत्यू दोन वाघांच्या झुंजीत झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

tiger fighting
पेंचमधील वाघिणीचा मृत्यू विषबाधेनेच

गुरुवारी (ता. ६) सकाळी ८ वाजता मृत वाघाचा पंचनामा नोंदवून मृतदेह पोर्ला वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात आणण्यात आला. वडसाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, गडचिरोलीचे उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी, विभागीय वन अधिकारी (दक्षता) जमीर शेख, सहायक वनसंरक्षक वायभासे, चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी, मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे यांच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एस. लेकामी, पोर्लाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बी. आर. रामटेके यांच्या चमूने मृत वाघाचे शवविच्छेदन केले. मृत वाघाच्या मानेवर व पायाला झुंजीतील दुसऱ्या वाघाने चावल्याच्या जखमा दिसून आल्या.

या मृत वाघाचे वय अंदाजे ३ ते ४ वर्षे असावे, असे सांगितले आहे. शवविच्छेदनाची संपूर्ण प्रक्रिया सकाळी १० ते दुपारी १२ वाजतापर्यंत पूर्ण करण्यात आली. त्यानंतर दुपारी १२ वाजता मृत वाघाचे दहन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com