हॉटेलमालकाला मागितली एका लाखाची खंडणी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जुलै 2018

नागपूर - हॉटेलमालकाला एका गुन्ह्यात अटक न करण्यासाठी खंडणी मागणाऱ्या तीन तोतया पोलिसांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 मे, 2018 ते 15 जून 2018 च्या दरम्यान कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महाल, बडकस चौक रहिवासी विष्णू धनराज अडवानी (55) यांना एका गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आरोपी मोहम्मद फैजल शकील पठाण, (रा. नंदनवन), शेख नूर बब्बूभाई शेख (52, रा. देशपांडे ले-आउट), रौनक विठ्ठलराव निखारे (26, रा. केडीके कॉलेजजवळ, नंदनवन) यांनी संगणमत करून पोलिस असल्याची बतावणी केली आणि धाक निर्माण केला.

नागपूर - हॉटेलमालकाला एका गुन्ह्यात अटक न करण्यासाठी खंडणी मागणाऱ्या तीन तोतया पोलिसांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 मे, 2018 ते 15 जून 2018 च्या दरम्यान कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महाल, बडकस चौक रहिवासी विष्णू धनराज अडवानी (55) यांना एका गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आरोपी मोहम्मद फैजल शकील पठाण, (रा. नंदनवन), शेख नूर बब्बूभाई शेख (52, रा. देशपांडे ले-आउट), रौनक विठ्ठलराव निखारे (26, रा. केडीके कॉलेजजवळ, नंदनवन) यांनी संगणमत करून पोलिस असल्याची बतावणी केली आणि धाक निर्माण केला. त्यानंतर या तिघांनी अडवानी यांच्याकडून खंडणी स्वरूपात 3 लाख 55 हजार रुपये वसूल केले. त्यानंतर त्यांनी अडवानी यांना आणखी एक लाख रुपयाची खंडणी मागितली. या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. 

संशयास्पद प्रकरण! 
विष्णू अडवानी यांचे हॉटेल असून त्यांनी असा कोणता गुन्हा केली की, तोतया पोलिसांनी त्यांना अटक करण्याची धमकी दिली? तसेच असे कोणते कृत्य केले की, अडवानी यांनी तब्बल 3 लाख 55 हजार रुपये आतापर्यंत दिले. हे प्रकरण संशयास्पद असून यामध्ये कोतवाली पोलिसांसह हॉटेलमालकाची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा आहे. 

Web Title: one lakh ransom demanded to hotel owner