दारूबंदीचा लढा : महिलांचे मुंडण ते मुख्यमंत्र्यांना घेराव

दारूबंदीचा लढा : महिलांचे मुंडण ते मुख्यमंत्र्यांना घेराव

चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये अनेक वर्षांपासून दारूबंदीसाठी संघर्ष सुरू होता. स्थानिक पातळीवर अनेक संघटना हे काम करीत होत्या. मात्र, ५ जून २०१० रोजी दारूबंदीचा खरा लढा सुरू झाला. चंद्रपूरच्या ज्युबली हायस्कूल ‘श्रमिक एल्गार’ संघटनेने दारूबंदीची मागणी करणाऱ्या संघटनांना संघटित केले आणि परिषद भरवली. त्यानंतर या मागणीसाठी सातत्याने मोर्चे, निवेदन, सत्याग्रह, मोर्चे सुरूच होते. ४ ते १० डिसेंबर २०१० ला दारूबंदीच्या मागणीसाठी चिमूर ते नागपूर पदयात्रा (विधानसभेवर) काढण्यात आली. (One lakh women had written letters to the Chief Minister for a ban on alcohol)

सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत यावर आवाज उचलला. त्यामुळे फेब्रुवारी २०११ मध्ये तत्कालीन पालकमंत्री संजय देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने समिती तयार केली. त्यामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, डॉ. विकास आमटे, माजी आमदार शोभाताई फडणवीस यांच्यासारखे ७ सदस्य होते. या कमिटीने फेब्रुवारी २०१२ मध्ये अहवाल मुख्यमंत्र्यांनी सुपूर्द केला. मात्र, यावर काहीच कारवाई झाली नाही.

दारूबंदीचा लढा : महिलांचे मुंडण ते मुख्यमंत्र्यांना घेराव
दुर्दैवी! स्मशानभूमीत ७० मृतांच्या अस्थींची पोती बांधून

६ ऑक्‍टोबर २०१२ ला मुख्यमंत्र्यांना एक लाख महिलांनी दारूबंदीची मागणी करणारे पत्र लिहिले. १२ डिसेंबर २०१२ ला मुख्यमंत्र्यांना नागपुरात घेराव घालण्यात आला. २६ जानेवारी २०१३ रोजी जेलभरो आंदोलन चंद्रपूरला झाले. ३० जानेवारी २०१२ ला दारूबंदी विरोधकांनी देखील हजारोंच्या संख्येत रस्त्यावर उतरून दारूबंदीला विरोध केला. दारूबंदीला विरोध करणारा हा मोर्चा ऐतिहासिक असाच म्हणावा लागेल.

१४ ऑगस्ट २०१४ ला पारोमिता गोस्वामी यांनी ३० महिलांसह मुंडण केले. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांनी दारूबंदी हटविण्याचा शब्द दिला. राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार आले आणि पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत १ एप्रिल २०१५ ला चंद्रपुरात दारूबंदी लागू झाली. पाच वर्षांनंतर राज्यात अनपेक्षितपणे महाविकासआघाडीचे सरकार आले.

दारूबंदीचा लढा : महिलांचे मुंडण ते मुख्यमंत्र्यांना घेराव
मुलगी नाही तर मुलगा झाला हो; क्रूर बापाकडून एक वर्षाच्या चिमुकल्याची हत्या

विजय वडेट्टीवार यांना पालकमंत्री पद मिळाले. त्यांनी पहिल्या जिल्हा दौऱ्यात दारूबंदी हटविणार असा शब्द दिला. ३ फेब्रुवारी २०२१ रोजी दारूबंदीच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी समिती गठित केली. १० ते २५ फेब्रुवारीपर्यंत लिखित स्वरूपात अभिप्राय मागवले. १६ मार्च २०२१ ला जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्री यांना दारूबंदी समीक्षा समितीचा अहवाल सादर केला. याच अहवालाच्या आधारे मंत्रिमंडळाने दारूबंदी हटविण्याचा निर्णय घेतला.

(One lakh women had written letters to the Chief Minister for a ban on alcohol)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com