गडचिरोलीत नक्षली हल्ल्यात 1 कमांडो हुतात्मा, 12 जखमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

नक्षली साहित्य जप्त

चकमकीची दुसरी घटना भामरागड तालुक्‍यातील लाहेरी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या हातदंडी जंगलात घडली. पोलिसांनी घटनास्थळी तीन भरमार बंदुका, तीन पिट्टू, बंदुकीचे छर्रे, स्फोटके भरलेली केटली आणि नक्षली साहित्य जप्त केले आहे. 

गडचिरोली : नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत असताना भामरागडमध्ये नक्षलवाद्यांनी 'सी-60' कमांडोंची बुलेटप्रूफ गाडी उडवली. यामध्ये एका कमांडोचा मृत्यू झाला असून, 12 पेक्षा अधिक जवान जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

रमेश तेलामी असं हुतात्मा झालेल्या कमांडोचं नाव आहे. महाराष्ट्र पोलिसांचे नक्षलवादविरोधी विशेष दल असलेल्या 'सी-60' च्या कमांडोंचं पथक गस्तीवर असतानाच नक्षलवाद्यांनी सुरुंगाने त्यांची बुलेटप्रूफ गाडी उडवण्यात आली. तत्पूर्वी, पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये दोन ठिकाणी चकमक झाली. यावेळी नक्षलवाद्यांचे शस्त्र आणि साहित्य सापडले. ही घटना आज (ता. 2) सायंकाळी तलवारगड व लातदंडी जंगल परिसरात घडली. आज दुपारी भामरागड तालुक्‍यातील कोठी पोलिस मदत केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या कोरपती जंगलात झालेल्या चकमकीत तीन पोलिस जखमी झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांची नक्षलवाद्यांशी आधी चकमक झाली होती. त्या रागातून नक्षलवाद्यांनी कमांडोंची गाडी उडवली.

कुरखेडा पोलिस उपविभागांतर्गत येत असलेल्या ग्यारापत्ती येथील पोलिस व सीआरपीएफ जवान नक्षलविरोधी अभियान राबवत होते. तलवारगड जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार सुरू केल्यानंतर नक्षलवादी साहित्य सोडून पळून गेले. चकमकीची दुसरी घटना भामरागड तालुक्‍यातील लाहेरी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या हातदंडी जंगलात घडली. पोलिसांनी घटनास्थळी तीन भरमार बंदुका, तीन पिट्टू, बंदुकीचे छर्रे, स्फोटके भरलेली केटली आणि नक्षल साहित्य जप्त केले आहे. 
 

Web Title: one maryred, 12 injured in naxal attack