25 सदस्यांचा एकवेळचा भात शिजतो सूर्यचुलीवर

file photo
file photo

नागपूर : सुमारे बाराव्या शतकापासून पाकसंस्कृतीचा अविभाज्य घटक असलेला सूर्यचुलीचा (सोलर कुकर) सहभाग काळानुरूप इतिहास जमा होतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात मुलांना "सूर्यचूल म्हणजे काय रे भाऊ' असेच म्हणायची वेळ येणार आहे. शहरात सूर्यचुलीचा उपयोग कुठे होतो? हे आम्ही तपासण्याचा प्रयत्न केला तर असा एक आश्रमात तब्बल 25 सदस्यांचे वरणभात सूर्यचुलीवलीवर शिजत असल्याचे आम्हाला समजले.
दीक्षाभूमीजवळील वसंतनगर येथील ब्रह्माकुमारीज आश्रमात गेल्या 10 वर्षांपासून सूर्यचुलीचा उपयोग होतो आहे. विशेष म्हणजे ही चूल थेट अबुधाबीवरून बोलावण्यात आली आहे. आश्रमात राहणाऱ्या सुमारे 20 ते 25 सदस्यांचा एकवेळचा भात सूर्यचुलीवरच शिजत असल्याची माहिती आश्रमातील अधिकारी मनीषादीदी यांनी दिली. शिवाय या चुलीवर कोणतेही पदार्थ भाजण्याचे अथवा उकडण्याचे काम अगदी सहज होत असून, गरजेनुसार या चुलीवर रवा किंवा शेंगदाणे भाजण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या सूर्यचुलीला एक मोठे सूर्यपात्र असून, त्यात चार डबे बसतील, अशी बास्केट आहे. त्यात आपण तांदूळ आणि डाळ जसे कुकरमध्ये लावतो असे तसे भांड्यात ठेवून सूर्यचुलीवर ठेवले की, तासाभरात भात तयार होतो. तसेच केवळ आभाळ असेल तर या सूर्यचुलीचा उपयोग नसून, इतर वेळेत कोणत्याची ऋतुत ही सूर्यचूल उपयोगी असल्याचे मनीषादीदी म्हणाल्या. इतकेच नव्हे तर या सूर्यचुलीवरील अन्न किरणांच्या उष्णतेने शिजत असल्याने हे अन्न अधिकच पौष्टिकच होत असल्याचे निसर्गोपचारतज्ज्ञ सांगतात.
इंधनाची बचत महत्त्वाची
स्वयंपाक करण्याची पद्धत आपण काळानुरूप बदलत आहोत. पण पारंपरिक पद्धतही आपण जपली पाहिजे. संस्कृती, परंपरा जपणे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. या सूर्यचुलीवर जेवढा स्वयंपाक झाला तेवढीच इंधनाची बचत होणार आहे. ही बचत अनेक गरजूंच्या उपयोगी पडेल, असा विश्‍वास मनीषा दीदी यांनी व्यक्‍त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com