esakal | ऑनलाइन कपडे खरेदी करणे पडले महागात... अशी झाली लुबाडणूक
sakal

बोलून बातमी शोधा

online fraud

मुखरामप्रसाद धर्मदेवप्रसाद (वय 33, रा. आरीपुर सरायान, उत्तरप्रदेश) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते सद्य:स्थितीत नांदगावखंडेश्वर तालुक्‍याच्या मंगरुळचव्हाळा येथील समृद्धी महामार्गाच्या कामात व्यक्त आहेत. त्यांनी फ्लिपकार्डद्वारे काही वस्तू व कपडे खरेदी केले. परंतु खरेदी केलेल्या वस्तू न आल्यामुळे त्यांनी कस्टमर केअरसोबत संपर्क साधला. बनावट कस्टमर केअरने त्यांना एनीडेज हे ऍप डाऊनलोड करायला सांगून क्रेडिट कार्डची पूर्ण डिटेल्स घेतली.

ऑनलाइन कपडे खरेदी करणे पडले महागात... अशी झाली लुबाडणूक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

अमरावती : जिल्ह्यातील समृद्धी कॅम्प येथील उत्तरप्रदेशच्या व्यक्तीने ऑनलाइन कपडे खरेदी केले. त्यानंतर कस्टमर केअरशी संपर्क साधला. परंतु बनावट कस्टमर केअरने पाठविलेल्या लिंकवर क्‍लिक करून गोपनीय माहिती शेअर करताच सदर व्यक्तीच्या खात्यामधून 1 लाख 4 हजार रुपयांची रोकड दुसऱ्या खात्यात वळती झाली. 

मुखरामप्रसाद धर्मदेवप्रसाद (वय 33, रा. आरीपुर सरायान, उत्तरप्रदेश) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते सद्य:स्थितीत नांदगावखंडेश्वर तालुक्‍याच्या मंगरुळचव्हाळा येथील समृद्धी महामार्गाच्या कामात व्यक्त आहेत. त्यांनी फ्लिपकार्डद्वारे काही वस्तू व कपडे खरेदी केले. परंतु खरेदी केलेल्या वस्तू न आल्यामुळे त्यांनी कस्टमर केअरसोबत संपर्क साधला. बनावट कस्टमर केअरने त्यांना एनीडेज हे ऍप डाऊनलोड करायला सांगून क्रेडिट कार्डची पूर्ण डिटेल्स घेतली. त्याआधारे तोतयाने मुखरामप्रसाद यांच्या बॅंकखात्यामधून एक लाखांच्या वर रक्कम उडविली. मुखरामप्रसाद यांच्या तक्रारीवरून ग्रामीणच्या सायबर ठाण्यात अनोळखी मोबाईलधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अल्पवयीन मुलीचे चार वर्षे केले शोषण अन् ती झाली गर्भवती...

तोतया बॅंक अधिकाऱ्यांने 30 हजार लुबाडले
एका अन्य घटनेत नांदगावखंडेश्वर तालुक्‍यातील पहुर येथील एका व्यक्तीची 29 हजार 997 रुपयांनी फसवणूक करण्यात आली. नितीन अजाबराव काळे (वय 46 रा. पहुर) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. एका अनोळखी व्यक्तीने काळे यांना फोन करून सेंट्रल बॅंकेतून बोलत असल्याची बतावणी केली. बऱ्याच दिवसांपासून एटीएमकार्ड न वापरल्याने ते बंद होण्याची भीती दाखवली. त्यानंतर तोतयाने एटीएमकार्डची डिटेल्स घेतली. काही मिनिटात काळे यांच्या बॅंकखात्यामधून जवळपास तीस हजारांची रोकड दुसऱ्या खात्यात वळती झाली.

loading image