संत्रा निर्यातीसाठी ऑनलाइन गेटवे, विदर्भातील संत्रा उत्पादकांकडून प्रचंड प्रतिसाद

विनोद इंगोले
Thursday, 16 January 2020

नागपूर : संत्रा निर्यातीकरिता अपेडाकडून ऑनलाइन गेटवेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विदर्भातील संत्रा उत्पादकांकडून याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, येत्या काळात तब्बल 200 बागायतदारांची नोंदणी यावर केली जाणार आहे. सद्यस्थितीत मात्र पंजाबमधील किन्नो (संत्रा) उत्पादक एका शेतकऱ्यासह परभणी कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या जालना जिल्ह्यातील बदनापूर मोसंबी संशोधन केंद्र अशा दोघांचीच सिट्रसनेटवर नोंदणी आहे.

नागपूर : संत्रा निर्यातीकरिता अपेडाकडून ऑनलाइन गेटवेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विदर्भातील संत्रा उत्पादकांकडून याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, येत्या काळात तब्बल 200 बागायतदारांची नोंदणी यावर केली जाणार आहे. सद्यस्थितीत मात्र पंजाबमधील किन्नो (संत्रा) उत्पादक एका शेतकऱ्यासह परभणी कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या जालना जिल्ह्यातील बदनापूर मोसंबी संशोधन केंद्र अशा दोघांचीच सिट्रसनेटवर नोंदणी आहे.

निर्यातक्षम उत्पादनांसाठी अपेडाकडून ऑनलाइन गेटवेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याआधारे निर्यातदार आणि शेतकऱ्यांमध्ये सेतू बांधणीचे काम होते. निर्यातदारांना आपल्या भागातील निर्यातक्षम दर्जाचा शेतमाल पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती यावरून कळते. त्याकरिता अपेडाचा हा प्लॅटफार्म उपयोगी ठरला आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये सिट्रसनेट हा गेटवे अपेडाकडून सुरू करण्यात आला. अभोर (जि. फजीलका) येथील किन्नो (संत्रा) उत्पादक शेतकऱ्यासह बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्र अशा दोघांचीच नोंद झाली आहे.

हेही वाचा - अरे देवा... पहिल्याला सोडले, दुसऱ्यासोबत "लिव्ह इन'मध्ये तरीही रात्री जायची तिसऱ्याकडे
 

विदर्भात उत्पादनक्षम संत्राबागा असून राज्यात लिंबूवर्गीय फळपिकाखालील क्षेत्र दीड लाख हेक्‍टरवर आहे. परंतु, शासनाने जोर लावल्यानंतर काही टन संत्र्यांची निर्यात होऊ शकली. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने मात्र संत्रा निर्यातीला येत्या काळात चालना मिळण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्याकरिता अपेडाकडून 1 डिसेंबरला सिट्रसनेट हा गेटवे सुरू करण्यात आला.

क्लिक करा - नागपुरात तापडीया समुहावर प्राप्तीकर विभागाचे छापे
 

शेतकऱ्यांची वाढली उत्सुकता
सिट्रसनेटवर नोंदणी होत निर्यातीला चालना मिळावी, याकरिता नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या पुढाकाराने वनामतीमध्ये दोनदिवसीय संत्रा निर्यात कार्यशाळा झाली. याचे फलित म्हणून तब्बल 200 शेतकऱ्यांनी सिट्रसनेटवर नोंदणीसाठी संमती दर्शवित अर्ज भरून दिले आहेत. लवकरच त्यांना फार्म रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दिले जाणार आहे. पणनतज्ज्ञ गोविंद हांडे यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले होते.

मोसंबी उत्पादक पट्ट्यातून निर्यातीला प्रोत्साहन मिळावे, याकरिता संशोधन केंद्राच्याच बागेची नोंदणी करण्यात आली. मोसंबी उत्पादकांमध्ये निर्यातीसाठी जागृती वाढावी, याकरिता हा प्रयत्न केला. मराठवाड्यात 29 हजार हेक्‍टरवर मोसंबी क्षेत्र फळधारणेखाली आहे. वातावरण तसेच जमीन या पिकासाठी पोषक असल्याने हा निर्णय घेण्यात आला.
- संजय पाटील, प्रमुख, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर, जि. जालना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online registration started for orange export