esakal | ८० टक्के शाळा सुरूच, पण उपस्थिती मात्र २१ टक्केच
sakal

बोलून बातमी शोधा

only 21 percentage student presents in school

दिवाळीचा काळ संपला तरी शाळांची दारे उघडण्याबाबत संभ्रम होता. यावर तोडगा काढत शासनाच्या वतीने अखेर शाळा सरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार नववी ते बारावीपर्यंत वर्ग सुरू करण्याचे आदेश शासनाकडून काढण्यात आले.

८० टक्के शाळा सुरूच, पण उपस्थिती मात्र २१ टक्केच

sakal_logo
By
रूपेश खैरी

वर्धा : राज्य शासनाच्या आदेशाने शाळा सरू झाल्या आहेत. यात वर्ध्यात शिक्षकांच्या कोरोना चाचणीमुळे एकाच दिवशी शाळा सुरू करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात आतापर्यंत जिल्ह्यात 80 टक्‍के म्हणजेच 287 टक्‍के शाळांची दारे उघडली आहेत. असे असले तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती मात्र नगण्यच असून त्याचे प्रमाण 21 टक्‍के एवढे आहे. 

हेही वाचा - २०२१च्या सर्वाधिक सुट्ट्या शुक्रवारलाच; तर दोन रविवारी; शासकीय कर्मचाऱ्यांचा हिरमोड

दिवाळीचा काळ संपला तरी शाळांची दारे उघडण्याबाबत संभ्रम होता. यावर तोडगा काढत शासनाच्या वतीने अखेर शाळा सरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार नववी ते बारावीपर्यंत वर्ग सुरू करण्याचे आदेश शासनाकडून काढण्यात आले. प्रारंभी प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्याकडून शाळा सुरू करण्याच्या जबाबदारीतून आपल्याला मुक्‍त ठेवण्याचा प्रकार सुरू केला. प्रत्येक वरिष्ठाने आपली जबाबदारी कनिष्ठावर लादण्याचा प्रकार सुरू केला. अखेर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाची जबाबदारी शाळा व्यवस्थापनावर सोपविण्यात आली. 

हेही वाचा - धक्कादायक! यवतमाळात पाण्याच्या ६५० स्त्रोतांत फ्लोराईड...

ही जबाबदारी अंगावर येताच आधी शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करण्यात आली. या चाचणीत जिल्ह्यात 70 वर शिक्षक आणि कर्मचारी पॉझिटिव्ह निघाले. यातही चाचणी करण्याच्या सुविधा मोजक्‍याच असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून ज्या शिक्षकांची तपासणी झाली. त्यांनी शाळा सरू करावी. इतर शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होतील, असे आदेश निर्गमित केले. या आदेशानुसार सध्या अंमलबजावणी सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानुसार जिल्ह्यात 10 डिसेंबरपर्यंत शाळा सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. आतापर्यंत सुरू झालेल्या शाळांची संख्या पाहता येत्या दिवसात पूर्णच शाळा सुरू होतील असे संकेत आहेत.

हेही वाचा - मिरचीचे दर दिवसागणिक होताहेत कमी; शेतकऱ्यांनी आपली...

10 हजार विद्यार्थ्यांचीच उपस्थिती -
नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू झाल्या असून येथे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण फारच कमी आहे. आतापर्यंत केवळ 10 हजार विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शविली असून त्याची टक्‍केवारी केवळ 21 एवढी आहे. यामुळे कोविडची भीती नागरिकांच्या मनात कायम असून ते आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यासाठी तयार नसल्याचे दिसून आले आहे. ही उपस्थिती केव्हा वाढेल हे सांगणे सध्या कठीण आहे.