
लॉकडाउनच्या काळात मागील काही महिन्यांपूर्वी संपूर्ण व्यवहार बंद पडल्याने सर्वांनाच घरी बंदिस्त राहावे लागले. अनेकांचे रोजगार गेले, बेरोजगारी वाढली. त्यामुळे मानसिक ताणतणाव अधिक वाढले.
अमरावती : आजच्या काळातील सर्वांत मोठी समस्या असलेल्या ताण तणाव, नैराश्याच्या गर्तेतून बाहेर पडण्याची साधने मर्यादित आहेत. त्यामुळे व्यक्ती तसेच मानसोपचार क्षेत्रात कार्यरत मंडळींतील दरी अधिक वाढली आहे. प्रत्येक 10 हजार नागरिकांमागे एक मानसपोचारतज्ज्ञ असावे असे सर्वसाधारण प्रमाण असते. मात्र, आजच्या स्थितीत हे प्रमाण कमी झालेले दिसून येत असल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे.
हेही वाचा - ‘डिअर मम्मी-पप्पा, तुम्ही वेळ देत नाही आम्ही घर सोडतोय...
लॉकडाउनच्या काळात मागील काही महिन्यांपूर्वी संपूर्ण व्यवहार बंद पडल्याने सर्वांनाच घरी बंदिस्त राहावे लागले. अनेकांचे रोजगार गेले, बेरोजगारी वाढली. त्यामुळे मानसिक ताणतणाव अधिक वाढले. अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या पाहता या क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञांची संख्या अतिशय कमी आहे. एकट्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मानसिक रोग कक्षाची दररोजची ओपीडीच मूळात 30 ते 40 रुग्णांची आहे. त्या तुलनेने याठिकाणी दोन ते तीनच मानसोपचार तज्ज्ञ कार्यरत आहेत. यावरून जिल्ह्याची कल्पनाच न केलेली बरी. एकूणच मानसिक वैफल्याचा सामना करण्यासाठी पुरेशी यंत्रणाच अद्याप विकसित झालेली नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा - आई म्हणून जन्मदात्रीने आपले कर्तव्य पार पाडले; मात्र, मुलांनी सोडले वाऱ्यावर!
गुणात्मकता महत्त्वाची -
संख्येपेक्षा गुणात्मकता अधिक महत्त्वाची आहे. मूळात कोरोनामुळे सध्या निर्माण झालेल्या मानसिक परिस्थितीचा सामना आव्हानात्मक रूपाने करायचा की संकट म्हणून पाहायचे याचा विचार ज्याचा त्याने केला पाहिजे. मानसोपचारतंज्ज्ञांची संख्या तुलनेने कमी आहे, असे आपण मानत नाही. कारण याठिकाणी गुणात्मकता महत्वाची ठरते आणि ती आहे. आपल्यावर ओढवलेला प्रसंग नेहमीच संकट आहे, असे मानून चालणार नाही. त्याचा आव्हानात्मक मुकाबला करायला शिकले पाहिजे.
- पंकज वसाडकर, मानसोपचारतज्ज्ञ.
हेही वाचा - उड्डाणपुलावर ठिकठिकाणी खड्डे, वाहनचालकांवर अपघाताची...
मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत मंडळींची संख्या कमी आहे, हे मान्य. मात्र, नागरिकांनी सुद्धा आपले कर्तव्य जाणून घेतले पाहिजे. अनेकदा उपलब्ध संसाधनाचा वापर केला जात नाही. आज अमरावतीत या क्षेत्रात अनेक लोक कार्यरत आहेत. मात्र, ज्यांना मानसिक त्रास जाणवतो असे अनेक लोक मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्यास तयारच नसतात. त्यांची मानसिकता तयारच होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे कमी संख्येला दोष देवून चालणार नाही.
- डॉ. अमोल गुल्हाने, मानसोपचारतज्ज्ञ