बाल उद्यानाने फुलले कोमेजलेले बाल चेहरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

गोरेगाव : येथील नगरपंचायतीद्वारे बालकांचा शारीरीक, मानसिक विकास साधून नगर विकास करण्यासाठी नगरात १२ ठिकाणी बाल उद्यानाचे कामे ८ लाख रुपये खर्च करुन तयार केले आहेत. या बाल उद्यानाने कोमजलेले बाल चेहरे हसु फुलले आहेत. 

गोरेगाव : येथील नगरपंचायतीद्वारे बालकांचा शारीरीक, मानसिक विकास साधून नगर विकास करण्यासाठी नगरात १२ ठिकाणी बाल उद्यानाचे कामे ८ लाख रुपये खर्च करुन तयार केले आहेत. या बाल उद्यानाने कोमजलेले बाल चेहरे हसु फुलले आहेत. 

बालकांचा शारीरीक, मानसिक विकासाला चालना देण्यासाठी नगराध्यक्ष सिमा कटरे, उपाध्यक्ष इंजी आशिष बारेवार, मुख्याधीकारी संदीप चिद्रवार, सभापती हिरणबाई झंझाड, शामली जायस्वाल, शोभा लटये व नगर सेवकांच्या सहकार्याने १२ ठिकाणी यात चंद्रपुरटोली, हलबीटोला, इरखा प्रभाग ७, चांभारबोडी, शिवाजी पार्क प्रभाग १३, प्रभाग १४,९,७ मध्ये आंगणवाडी जवळ , शिवमंदीर प्रभाग १६, इंदिरा नगर , विठ्ठल रुखमाई मंदीर प्रभाग ६, पवन तलाव, आखर, गणेश मंदीर प्रभाग १५ या ठिकाणी बाल उद्यान तयार करण्यात आले.

या बाल उद्यानात असलेल्या साहित्यामुळे सकाळ, संध्याकाळ मुले, मुली लाभ घेत आहेत. यामुळे पालकसुद्धा आनंदीत झाले असुन त्याठिकाणी बाग तयार करण्यात यावी अशी मागणी पालक, बालकांनी केली आहे. मागणीनुसार लवकरच बाग तयार करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी दिले बाल उद्याने तयार करण्यासाठी ८ ठिकाणी व इतरत्र केरकचरा, अस्वच्छता पसरली होती. ही जागा तयार करण्याकरीता स्वच्छता मोहिम राबवुन निकामी जागेवर बाल उद्याने तयार करण्याचे धाडस नगराध्यक्ष यांनी दाखविल्याने नगरवासीयांनी प्रशंसा केली. या ठिकाणी बाग तयार झाल्यास नगरवासी लाभ घेऊ शकणार आहेत. नगर विकास साधण्याकरिता सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष सिमा कटरे, उपाध्यक्ष इंजी आशिष बारेवार, सभापती, नगरसेवक, मुख्याधीकारी संदीप चिद्रवार यांनी केले.

Web Title: Opening a garden children gets happy