सरकारची कोंडी करण्याचा विरोधकांचा डाव फसला

पंजाबराव ठाकरे
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

आगामी हिवाळी अधिवेशनात गत वर्षीच्या बोंडअळीच्या अनुदानावरून राज्य सरकारला कोंडीत धरण्याचा विरोधकांचा डाव आमदार कुटेच्या पुढाकारामुळे फेल ठरणार. हे नुकतेच प्राप्त झालेल्या 650 कोटी रुपयांचे अनुदानावरून स्पष्ट होत आहे.

संग्रामपूर(बुलढाणा) - आगामी हिवाळी अधिवेशनात गत वर्षीच्या बोंडअळीच्या अनुदानावरून राज्य सरकारला कोंडीत धरण्याचा विरोधकांचा डाव आमदार कुटेच्या पुढाकारामुळे फेल ठरणार. हे नुकतेच प्राप्त झालेल्या 650 कोटी रुपयांचे अनुदानावरून स्पष्ट होत आहे.

बोंडअळींचे अनुदान दिवाळीपूर्वी शेतकऱयांना देण्यात यावे यासाठी विदर्भातील आमदार डाॅ. संजय कुटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आग्रह धरला होता. या बाबतचे स्पष्टीकरण त्यानी 5 नोव्हेबर रोजी 'सकाळ'सोबत बोलताना दिले. गतवर्षी बोंडअळीमूळे झालेल्या नुकसानी पोटी शेतकऱ्याना आर्थिक मदत म्हणून शासनाने अनुदान जाहीर केले. त्या पैकी दोन टप्प्यात वाटपही झाले. तिसरा 650 कोटी रुपयांचा टप्पा बाकी होता.

दप्तर दिरंगाई मुळे शेतकऱ्याचा शासना प्रति रोष वाढता होता. अशा परिस्थितीत शासनाकडे तीनशे कोटी रुपयांचा निधी शिल्लक होता. तो निधी मराठवाड्याकडे वळती करण्याचा प्रयत्न त्या भागातील मंत्र्याचा सुरू झाला होता. असे झाले असते तर नजीकच्या विदर्भातील शेतकरी आणखीच संतप्त झाले असते. व याच मुद्द्यावर विदर्भातील विरोधकांनी शासनाला कोंडीत धरण्याची तयारी सुरू केली होती. ही बाब हेरून मध्यप्रदेश मध्ये  निवडणूकच्या प्रचाराचे नियोजनात व्यस्त असताना आमदार कुटेंनी राज्यसरकारची भुज राखण्यासाठी पुढाकार घेतला. तेथूनच मुख्यमंत्री यांना संदेश पाठवून दिवाळी पूर्वी एकही शेतकरी बोंडअळीचे अनुदाना पासून वंचित राहता कामा नये.

अन्यथा शासनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे ही नमूद केले. आमदार कुटे मुख्यमंत्री याचे जवळीक मानले जातात. त्या पेक्षा त्याचे बोललण्यावर विश्वास अधिक असल्याने मुख्यमंत्री यांनी लगेच प्रधान सचिव परदेशी याचे सोबत आमदार कुटेंची बैठक आयोजित केली. त्या मध्ये शासनाकडे तीनशे कोटीची तरतूद असल्याचे समोर आले. आमदार कुटे यांनी मुख्यमंत्री यांना एकूण  650 कोटींची गरज असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री यानी  उर्वरित 350 कोटी रुपयांची तरतूद करून दिल्याने दिवाळी पूर्वी तिसऱ्या टप्प्यातील बोंडअळीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे सोयीस्कर झाले. आमदारांच्या पुढाकाराने विरोधकांचा मनसुबा थंड पडला आणी शेतकऱयांना दिवाळी साठी पैसे कामी आले.

Web Title: Opponent game on the government is failed