संतरागाची- हापा दिवाळी स्पेशल ट्रेन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

अमरावती :  दीपावलीनिमित्त प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता मध्यरेल्वेने संतरागाची- हापा या मार्गावर स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 11 आणि 18 ऑक्‍टोबरला ही विशेष गाडी धावणार आहे. गाडी क्रमांक (82034) अप संतरागाची- हापा ही गाडी शुक्रवारी रात्री 9.15 मिनिटाला प्रस्थान करून रविवारी दुपारी 4.35 वाजता हापा येथे पोहोचेल. गाडी क्रमांक (02833) डाऊन हापा -संतरागाची ही गाडी सोमवारी सकाळी 10.40 वाजता हापावरून सुटून बुधवारी पहाटे 5.45 वाजता संतरागाची येथे पोहोचेल.

अमरावती :  दीपावलीनिमित्त प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता मध्यरेल्वेने संतरागाची- हापा या मार्गावर स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. 11 आणि 18 ऑक्‍टोबरला ही विशेष गाडी धावणार आहे. गाडी क्रमांक (82034) अप संतरागाची- हापा ही गाडी शुक्रवारी रात्री 9.15 मिनिटाला प्रस्थान करून रविवारी दुपारी 4.35 वाजता हापा येथे पोहोचेल. गाडी क्रमांक (02833) डाऊन हापा -संतरागाची ही गाडी सोमवारी सकाळी 10.40 वाजता हापावरून सुटून बुधवारी पहाटे 5.45 वाजता संतरागाची येथे पोहोचेल. संतरागाची- हापा मार्गावरील खगडपूर, टाटानगर, चक्रधरपूर, राऊलकेला, झारसुगडा, बिलासपूर, रायपूर, दुर्ग, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, अमळनेर, नंदूरबार, सूरत, भरूच, बडोदा, आनंद, अहमदाबाद, सुरेंद्रनगर, वाकानेर व राजकोट स्थानकावर ही गाडी थांबेल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Orangi-Hapa Diwali Special Train