तक्रार निवारण प्राधिकारीच्या आदेशाला केराची टोपली 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

गोरेगाव (गोंदिया) - तालुक्यातील कालीमाटी येथील महेश मेश्राम व गावकरी यांनी ६ जानेवारीला तक्रार निवारण प्राधिकारी जिल्हाधिकारी गोंदियाला तक्रार दाखल केली. या तक्रारीचे निवारण करण्याकरीता गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे गोरेगाव यांच्या नावे ता ९ मार्च रोजी  आदेश काढण्यात आले होते. या आदेशाला गटविकास अधिकारी यांनी केराची टोपली दाखविल्याने महेश मेश्राम यांनी पुन्हा ता १७/५ ला तक्रार निवारण प्राधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. 

महेश मेश्राम व गावकरी यांनी ग्रामसभेत कोंबडीबुरे यांच्या शेताकडे जाणा-या रस्त्यावरील नाल्यावर मोरीबांधकाम करण्यात यावे. असे ठराव घेण्यात आले.  सन १६-१७ या वर्षात तांत्रीक व प्रशासकीय मंजुरी घेण्यात आली. पण ग्रामपंचायतीला काम सुरु करण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांनी दिले नाही. यामुळे हे मोरी बांधकाम करण्यात आले नाही. या रस्त्यावरील नाला अरुंद असल्याने पावसाळ्यात ये-जा करण्यासाठी गावकरी व जनावरांना अडचणीचा सामना करावा लागतो. यावर तोडगा काढण्यासाठी महेश मेश्राम व गावकरी यांनी पोर्टलवर तक्रार निवारण प्राधिकारी यांच्याकडे ता ६ जानेवारीला तक्रार दाखल केली होती. या रस्त्यावरील नाल्यावर मोरी बांधकाम करण्यात यावे असे आदेश गटविकास अधिकारी यांना ९ मार्चला देण्यात आले. व हे काम १५ दिवसात सुरु करुन तसे अहवाल सादर करावे असे आदेश गटविकास अधिकारी यांना दिले होते. त्यानंतरही गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे यांनी या रस्त्यावरील नाल्यावर मोरी बांधकामास प्रशासकीय मंजुरी दिली नाही. अशा हलगर्जीपणा करणा-या गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे यांच्यावर योग्य कारवाही करवी. तसेच या मोरी बांधकामास प्रशासकीय मंजुरी देण्यात यावी अशी मागणी महेश मेश्राम व गावकरी यांनी जिल्हाधीकारी, तहसिलदार गोरेगाव, सरपंच/ ग्रामसेवक कालीमाटी यांना केली.

Web Title: Order of grievance redressal authority