बंदूक मागवा आता घरुनच; वाचा कसे काय?

banduk license.
banduk license.

अकोला : शस्त्र परवाना मिळवण्यासाठी सर्वसामान्यांना पोलिस ठाण्यांच्या तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागण्याचे प्रकार आता कमी होणार आहेत. कारण, मेट्रो सिटीनंतर आता अकोल्यातही लवकरच शस्त्र परवाना मिळवण्याची प्रक्रिया ऑनलाइन होणार असून, या प्रणालीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

लवकरच होणार प्रक्रिया सुरू
शस्त्र परवाना मिळवण्यासाठी सर्वसामान्यांना पोलिस ठाण्यांच्या तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागण्याचे प्रकार आता कमी होणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून यासाठी ५५ वर्ष जुन्या असणाऱ्या ‘आर्म ॲक्ट’मध्ये बदल करण्यात आले आहेत. शस्त्र बाळगणे हा केवळ दिखावा न होता, गरजवंतालाच परवाना कसा मिळेल, यावर भर देण्यात येणार आहे. या प्रक्रियेची अंमलबजावणी देशातील महानगरात सुरू झाली आहे. तर अमरावती परिक्षेत्रातील एकाही जिल्ह्यात अद्याप ही प्रक्रिया सुरू झाली नसून, येत्या काही दिवसांत ही प्रक्रिया सुरू होणार आहे.


निर्णय युनिट प्रमुखाकडेच
शस्त्र परवान्यासाठी अर्ज करताना सध्या पंधराहून अधिक कागदपत्रे जोडावी लागतात. त्यानंतर ही फाइल एका अधिकाऱ्यांकडून दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे पोहोचते. आयुक्तालयात या अर्जावर पोलिस आयुक्त, तर ग्रामीण भागात जिल्हाधिकारी निर्णय घेतात. ग्रामीण भागातून ही फाइल पोलिस अधीक्षकांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचत असते. पोलिस आयुक्त आणि जिल्हाधिकारी आपआपल्या कमिटीच्या बैठकीत या अर्जांवर निर्णय घेतात. कमिटीमध्ये निर्णय होत असले, तरी शस्त्र परवाना द्यायचा की नाही, याचा सर्वस्वी हा निर्णय युनिट प्रमुखच घेत असतात. परवाना नाकारला तर नागरिक सरकारकडे दाद मागतात. हा निर्णय किती काळात घ्यावा, यावर कायदेशीर कुठलेही बंधन नाही.

अकोल्यात 640 जणांकडे परवाना
आत्मसंरक्षणासाठी बंदुक बाळगणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज घडीला जिल्ह्यात 640 जणांकडे बंदुकीचे परवाने आहेत. विशेष म्हणजे त्यात 12 महिलांचा समावेश आहे. यासोबतच स्वत:ला असुरक्षित समजणाऱ्या राजकीय नेत्यांचा यादीत भरणा आहेच. नव्वदच्या दशकात बंदुका बाळगणारे परवानाधारक हाताच्या बोटावर मोजण्याएवढे होते. गेल्या 20 वर्षांत मात्र, हा आकडा झपाट्याने वाढला आहे. त्यामागची राजकीय, सामाजिक कारणे अनेक आहेत. वाढती गुन्हेगारी हे प्रमुख कारण दिसून येते. त्यामुळेच आत्मसंरक्षणासाठी बंदुका बाळगणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ज्यांना जीवाला धोका आहे असे वाटते अशांनी परवाने मिळवले आहेत. त्याशिवाय उद्योजक, डॉक्टरांचाही आणि व्यापारांचा यात समावेश आहे. परवानाधारकांच्या यादीकडे नजर टाकली असता यात महिलाही असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात तब्बल डझनभर महिलांकडे बंदुक बाळगण्याचा परवाना असल्याची माहिती समोर आली आहे.

गरजवंतालाच परवाना
ज्या व्यक्तीच्या जीवाला धोका आहे, अशा व्यक्तींना तत्काळ परवाना मिळाला पाहिजे. तसेच, देखाव्यासाठी शस्त्र घेवून मिरवणाऱ्यांना चाप लावण्याचा या नवीन बदलाचा एक प्रमुख हेतू असणार आहे. गेल्या काही वर्षांत शस्त्र बनवणाऱ्या कंपन्यामध्ये ‘फॉरेन डायरेक्ट इनव्हेंस्टमेंट’चे प्रमाण वाढले आहे. या बदलाचे हे एक प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.

बँक व्यवस्थापकांकडे परवाने
बँकेवर दिवसाढवळ्या दरोडा पडण्याचे प्रमाण जिल्ह्यात नगण्य जरी असले तरी राष्ट्रीयकृत बँकांच्या व्यवस्थापकांना बंदुकीचे परवाने देण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयकृत बॅंकाच्या 22 व्यवस्थापकांनी बंदूक बाळगण्याचा परवाना मिळवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com