'त्या' आदेशाने निराधारांची वाढली घालमेल 

file photo
file photo
Updated on

धाबा(चंद्रपूर) : वृद्ध, निराधार, अपंगांना शासनाकडून दर महिन्याला अनुदान दिले जाते. अनुदानाचा धनादेश स्वीकारण्यास विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेने नकार दिला. पाच महिन्यांचे जवळपास 34 लाखांचे अनुदानाचे धनादेश बॅंक टू तहसील कार्यालयात रेफर होत होते. गोंडपिपरी तहसीलदारांनी थेट बॅंक गाठली. तहसीलदारांनी तंबी दिल्यावर बॅंकेच्या शाखाधिकाऱ्याने धनादेश स्वीकारला. मात्र, राष्ट्रीयकृत बॅंकेत खाते काढा, अशी तहसीलदारांचा आदेश असलेली जाहीर सूचना भिंतीवर चिकटविण्यात आली. आता बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुक्‍याच्या ठिकाणी जाऊन बॅंकखाते काढण्याचे फर्मान सुटल्याने वृद्धांची घालमेल वाढली आहे. 

शासनाकडून निराधार, अपंग, विधवा, वृद्धांना विविध योजनेमार्फत दर महिन्याला अनुदान दिल्या जाते. या अनुदानावरच अनेक निराधारांचे पोट चालत आहे. टाळेबंदीत अनुदानाची नितांत गरज निराधारांना होती. निराधारांची गरज लक्षात घेऊन शासनाने तातडीने अनुदान पाठविले. गोंडपिपरीच्या तहसीलदार सीमा गजभिये यांनी संजय गांधी निराधार योजना व इतर सामाजिक अर्थसहाय योजनांचे धनादेश लाभार्थ्यांच्या यादीसह कोतवालामार्फत विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक शाखा धाबाकडे पाठविले. मात्र, बॅंकेच्या शाखाधिकाऱ्याने धनादेश स्वीकारण्यास नकार दिला. धनादेश बॅंक टू तहसील कार्यालययात दोन ते तीनदा रेफर झाले. टाळेबंदीत दोन पैसे मिळाल्यास हातभार होईल ही आस लावून बसलेले निराधार, वृद्ध, अंपग बॅंकेच्या चकरा मारीत होते. मात्र, अद्याप निधीच न आल्याचे त्यांना सांगण्यात येत होते. 

34 लाखांचे धनादेश कोतवालाकडे

जवळपास तहसील कार्यालयाने पाठविले 34 लाखांचे धनादेश कोतवालाकडे पडून होते. अखेर तहसीलदार सीमा गजभिये यांनी थेट बॅंकेचे कार्यालय गाठले. शाखाधिकाऱ्याला तंबी दिल्यानंतर बॅंकेने धनादेश स्वीकारले. मात्र, बॅंके बाहेर लावलेल्या जाहीर नोटीसमुळे निराधारांचा गोंधळ उडाला आहे. या नोटीसामध्ये बॅंकेने धनादेश नाकारल्याचा उल्लेख असून, यामुळे योजनेचा लाभापासून लाभार्थी वंचित राहीले. त्यामुळे राष्ट्रीकृत बॅंकेत खाते उघडून त्याची नोंद तहसील कार्यालयात करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. गोंडपिपरी येथे राष्ट्रीकृत बॅंक आहे. त्यामुळे बॅंकेचे खाते काढण्यासाठी आता वृद्धांना बारा किमीचे अंतर कापावे लागणार आहे. 

 
बॅंकेने धनादेश नाकारले. परिणामी टाळेबंदीत अनुदानाच्या लाभापासून लाभार्थी वंचित राहीले. याचा त्रास लाभार्थ्यांना होत आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रीयकृत बॅंकेत खाते काढावे. 
सीमा गजभिये ,तहसीलदार गोंडपिपरी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com