तो कुटुंबासह कसाबसा पोहोचला महाराष्ट्रात; मात्र, अस्वस्थ वाटू लागल्याने आश्रमशाळेजवळ थांबला अन्‌...

Worker died in gadchiroli district
Worker died in gadchiroli district

सिरोंचा (जि. गडचिरोली) : जिल्हा गडचिरोली... तालुका सिरोंचा... गाव रामंजापूर... येथील एक मजूर दाम्पत्य मजुरीसाठी तेलंगानाच्या करीमनगर येथे गेले... मात्र, देशात कोरोनाने शिरकाव केल्याने लॉकडाउन सुरू झाला... यामुळे हे दाम्पत्य जिल्ह्याची सीमा बंद असल्यामुळे तिथेच अडकून पडले... रविवारी सकाळी या कुटुंबाने गावी परतण्याचा निर्णय घेतला... मजूर, पत्नी, चौदा वर्षांचा मुलगा व दोन वर्षांची मुलगी हे वाहनाने आल्यानंतर प्राणहीता नदीच्या पुलावरून पायी जात होते. मात्र, मजुराला अस्वस्थ वाटू लागल्याने चौघेही तिथे थांबले. पाहता-पाहता मजुराने कुटुंबसमोरच जग सोडले... 

जिल्ह्यात काम मिळत नसल्याने रामंजापूर येथील एका मजुराने कुटुंबासह तेलंगाना गाठले. तेलंगानाच्या करीमनगर येथे मजुरी करून त्यांचा उदार्निवाह सुरू होता. परंतु, कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे त्यांचे काम बंद झाले. हाताला काम नाही, खायला अन्न नाही, अशा कठीण प्रसंगी ते तेलंगानातच अडकून पडले.

पाच महिन्यांपूर्वी या मजुराची प्रकृती खराब झाली होती. त्याच्यावर करीमनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काम नसल्याने व पैसेही जवळ नसल्याने रविवारी (ता. 17) सकाळी या कुटुंबाने गावी परतण्याचा निर्णय घेतला. ते एका खासगी वाहनाने प्राणहीता नदीच्या पुलावरील तेलंगानाच्या सीमेपर्यंत पोहोचले.

चौघांना धर्मपुरी येथील नाकाबंदीवर उतरवून वाहन तेलंगानात परत गेले. प्राणहीता नदीच्या पुलावरून चौघेही पायी महाराष्ट्राच्या हद्दीत दाखल झाले. धर्मपुरी येथील शासकीय आश्रमशाळेजवळ येताच मजुराला अस्वस्थ वाटू लागले. यामुळे चौघेही तिथेच थांबले. काही कळायच्या आताच अचानक मजुराचा मृत्यू झाला. 

मजुराला यकृताचा आजार

गडचिरोली जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नसल्याने तेलंगानातून आलेल्या इसमाचा महाराष्ट्राच्या हद्दीत दाखल होताच मृत्यू झाल्याने प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे. सिरोंचा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय अहीरकर यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले तर वैद्यकीय यंत्रणा आश्रमशाळेजवळ पोहोचली. तिथे मृतदेह आश्रमशाळेजवळ पडून होता. पोलिसांनी कुणालाही जवळ जाऊ दिले नाही. पोलिसांनी तेलंगानाच्या ज्या भागातून हा मजूर आला आहे, तेथील परिस्थितीची माहिती घेतली. तिथे सध्या तरी एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही. या मजुराला यकृताचा आजार असल्याची माहिती समोर आली.

जिल्ह्यात उडाली खळबळ

तेलंगानात लॉकडाउनमध्ये अडकलेले हजारो मजूर पायपीट करीत आपल्या जिल्ह्याकडे निघाले आहेत. परंतु, शेकडो किमी प्रवास करून महाराष्ट्रात राहणारा मजूर कसाबसा आपल्या राज्यात पोहोचला. दुर्दैवाने आपल्या कुटुबासमारेच त्याचा मृत्यू झाला. सरकार मजुरांना वाहतुकीची साधने उपलब्ध करून देत असतानाही हजारो मजूर पायपीट करीत गावाकडे निघाले आहेत. ग्रीनझोनमध्ये असलेल्या गडचिरोलीत ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

मजुरांची पायपीट सुरूच

तेलंगानात कामासाठी गेलेले गडचिरोली जिल्ह्यातील हजारो मजूर दररोज पायपीट करीत आपापल्या गावाकडे परतत आहेत. मात्र, रस्त्यात पाणी, भोजन व नाश्‍त्याची समस्या भेडसावत असल्याने मजुरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही सामाजिक संस्था तसेच प्रशासनाकडून मदतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, कारवाईच्या भीतीने मजूर जंगलातून प्रवास करीत असल्याने मदतकार्यात अडचणी जात आहे. सतत पाणी चालल्याने एका मजुराचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने त्याच्या कुटुंबीयांचे स्वॅब घेऊन कोरोनाची चाचणी कस्न तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्कता बाळगत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com