नक्षलवाद्यांनी केला भूसुरूंग स्फोट अन्‌ गोळीबार, पोलिस उपनिरीक्षकासह जवान शहीद

Two soldiers martyred in Gadchiroli Naxal attack
Two soldiers martyred in Gadchiroli Naxal attack

गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड तालुक्‍यातील घनदाट जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवित असलेल्या पोलिस पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. यात अतिशीघ्र कृती दलाचा पोलिस उपनिरीक्षक आणि विशेष अभियान पथकाचा एक जवान शहीद झाले. सोबतच गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या विशेष अभियान पथकाचे तीन जवान जखमी झाले. त्यांच्यावर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

रविवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास शीघ्र कृतीदल व सी-60 पथकाचे जवान भामरागड तालुक्‍यातील कोठी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या आलदंडी-गुंडुरवाही जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षल्यांनी प्रथम भूसुरुंगस्फोट घडवून गोळीबार केला, अशी माहिती आहे. पोलिसांनीही गोळीबाराने नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर दिले. मात्र, यात पोलिस उपनिरीक्षक धनाजी होनमने व शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले. तर गोंगलू ओक्‍सा, राजू पुसली व दसरू कुरचामी हे जवान जखमी झाले आहेत. दसरू कुरचामी या जवानाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

शहीद जवानांचे पार्थिव रविवारी दुपारी दोन वाजता हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणण्यात आले. जखमी जवानांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहेत. शहीद धनाजी होनमने हे पंढरपूर जिल्ह्यातील पुलूज येथील मूळ रहिवासी असल्याची माहिती आहे. ते साडेतीन वर्षांपासून भामरागड येथील शीघ्र कृतीदलात पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. शहीद किशोर आत्राम हे भामरागड तालुक्‍यातील आरेवाडा येथील रहिवासी आहेत. 

हत्येचा निषेध म्हणून...

दोन मे रोजी एटापल्ली तालुक्‍यातील सिनभट्टी येथील जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी जहाल नक्षली व कसनसूर दलमच्या विभागीय समितीची सदस्य सृजनक्का हिला कंठस्नान घातले होते. तिच्या हत्येचा निषेध म्हणून नक्षल्यांनी ठिकठिकाणी पोस्टर्स लावून 20 मे रोजी जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांनी हिंसक कारवाया करणे सुरू केले आहे. अशात ही घटना घडल्याने गडचिरोलीसह राज्यात खळबळ उडाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com