चांप्यात बहरल्या पेरू, बोरं, केळी; आदिवासी महिलेने फुलविली सेंद्रीय परसबाग

Organic Organic garden planted by tribal women
Organic Organic garden planted by tribal women

चांपा (जि. नागपूर) : उत्तम आहारासाठी लागणारा भाजीपाला विषारी खतांपासून मुक्त असावा व तो सहज उपलब्ध व्हावा, या हेतूने चांपा येथील यमुनाबाई इरपाते या आदिवासी महिलेने परसबाग फुलविली आहे.

नागपूर उमरेड रोडवरील चांपा गावामध्ये राहणाऱ्या आदिवासी महिला यमुनाबाई इरपाते, शिला वाढवे यांनी परसबागेत केळी फुलवली. इथल्या बोर, जांब, पपई केळीच्या घडांनी वाकलेले ही झाडे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रीय खतांचा वापर त्यांनी केला आहे. शेण, राख, लसूण व कडू लिंबाच्या पानांचा रस कुटून त्यात गोमूत्र टाकून २१ दिवस आंबवले व २२ व्या दिवशी सकाळी ते औषध फवारले त्यातून नैसर्गिक पिके घेतली. 

यमुनाबाई इरपाते यांनी घरासमोरील परसबागेत अनेक प्रकारचा भाजीपाला, फुलं व फळझाडांची लागवड केली आहे. सांडपाणी व स्वत: तयार केलेल्या नैसर्गिक खताचा उपयोग करून फुलवलेल्या परसबागेने त्यांनी आदर्श निर्माण केला आहे. नैसर्गिक खतांच्या वापराने परसबागेत बोर, निंबू, जांब, पपई, केळी ही फळे बहरू लागली आहेत.

नैसर्गिक खताचा वापर
देशी आणि नैसर्गिक खताचा वापर केल्याने माझी परसबाग फुलली आहे. गावातील गर्भवती, स्तनदा माता, लहान बाळांच्या उत्तम आरोग्यासाठी ही परसबाग फुलवली आहे. या परसबागेतून मिळणाऱ्या रकमेतून घरातील आर्थिक चक्र हळूहळू फिरू लागले आहे. 
- यमुना इरपाते,
एकल महिला ग्रामस्थ

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com