शेगांव येथे राज्यस्तरीय विराट कन्या कौशल्य शिबीराचे आयोजन

संजय सोनोने
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

5 दिवसीय शिबीरामध्ये 4 हजार कन्यांचा सहभाग

शेगांव (बुलडाणा): संत नगरी शेगांव येथे अखिल विश्व गायत्री परिवार व महाराष्ट्र प्रांतीय गायत्री परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने 5 दिवसीय निवासी विराट कन्या कौशल्य शिबीर मे ते 6 मे 2018 पर्यंत स्थानिक श्री गजानन महाराज संस्थानचे आनंद सागर विसावा मैदानावर केले आहे.

5 दिवसीय शिबीरामध्ये 4 हजार कन्यांचा सहभाग

शेगांव (बुलडाणा): संत नगरी शेगांव येथे अखिल विश्व गायत्री परिवार व महाराष्ट्र प्रांतीय गायत्री परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने 5 दिवसीय निवासी विराट कन्या कौशल्य शिबीर मे ते 6 मे 2018 पर्यंत स्थानिक श्री गजानन महाराज संस्थानचे आनंद सागर विसावा मैदानावर केले आहे.

या राज्यस्तरीय विराट कन्या कौशल्य शिबीरात 5 दिवसात विविध मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. 2 मे रोजी सकाळी 6 वाजता आनंद सागर विसावा या मैदानावरुन गायत्री परिवाराच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये संपुर्ण राज्यातुन आलेल्या कन्या तसेच विविध सामाजिक हित जोपासणारे देखावे सुध्दा सहभागी होणार असून गायत्री परिवाराचे सर्व मान्यवर व सदस्यांचा या शोभायात्रेत सहभाग राहणार आहे.

आनंद सागर विसावा येथुन सदर शोभायात्रेला सुरुवात होणार असुन सदर शोभायात्रा माळीपुरा, प्रगटस्थळ, गजानन महाराज दर्शन बारी, श्री.गजानन महाराज मंदीर येथे शोभायात्रेचे स्वागत होवून शहरातील मुख्य मार्गाने डॉ.बाबासाहेबआंबेडकर चौक, गांधी चौक, शिवाजी चौक, अग्रसेन चौक, आठवडी बाजार, शिवनेरी चौक, मुरारका हायस्कुल मार्गे पुन्हा विसावा येथे पोहचणार आहे.

शोभायात्रा समाप्त झाल्यानंतर विसावा येथे आयोजित या शिबीराचे दि. 2 मे रोजी  सकाळी 10 वाजता उदघाटन आद. डॉ.चिन्मय पण्डया(प्रति उपकुलपती देव संस्कृति विश्व विद्यालय, शांतिकुंज, हरिव्दार) यांच्या शुभ हस्ते होणार आहे.

3 मे, 4 मे, व 5 मे रोजी विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली मिशन गुरुदेवाचा परिचय, गायत्री आणि यज्ञ, विविध संस्कार आणि परंपरा, आईचे मुलीप्रती आवश्यक कर्तव्य, शैक्षणिक आणि भौतिक जिवनात अध्यात्माची आवश्यकता, आरोग्य व योग, दररोजचा परिपाठ, बालसंस्कार, स्वच्छता व पवित्रता, मुलींच्या विवाहीत जिवानावर आधारीत आईची शिकवण आदि विषयावर मार्गदर्शन सहभागी कन्यांना होणार आहे. सदर शिबीर हे निवासी असल्याने विविध उपक्रमांनी सज्ज असे आयोजन करण्यात आले आहे.

6 मे 2018 रोजी कन्यापुजन व गौरी दिक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये वंदनीया शैल दीदी तसेच श्रध्देय डॉ. प्रणव पण्डया भाई साहेब (प्रमुख अखिल विश्व गायत्री परिवार, तथा कुलाधीपती देव संस्कृती विश्व विद्यालय, हरिव्दार) हे करणार आहे.

कार्यक्रमाचे संचालनाचा पदभार शांतिकुंज हरिव्दार येथील प्रशिक्षित विशेष महिलांची चमु निभविणार आहेत. या शिबीराच्या आयोजनासाठी श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगांव च्या वतीने मोलाचे सहकार्य लाभले आहे.

राज्यस्तरीय विराट कन्या कौशल्य शिबीराकरीता अखिल विश्व गायत्री परिवार व महाराष्ट्र गायत्री परिवाराचे सर्व गणमान्य पदाधिकारी व सभासद आयोजनापासुनच कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता महत्वपुर्ण भुमिका बजावित आहेत.

Web Title: organizing state level girl skills camp at shegaon