esakal | कुणाला लक्ष्मी हवी का लक्ष्मी.... ? चार महिन्यांपूर्वी आढळली होती उकीरड्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

baby girl

चार महिन्यांपूर्वी तलावफैलातील उकिरड्यावर स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळून आले होते. शोध घेऊनही तिच्या पालकांचा शोध लागला नाही. अखेर तिला संगोपनासाठी वर्धा येथील शिशूगृहात ठेवण्यात आले आहे. "तेजस्विनी', असे नामकरण करण्यात आले असून, पुनर्वसनासाठी एखाद्या कुटुंबात दत्तक दिले जाणार आहे. त्यामुळे त्या चिमुकलीला लवकरच माता-पित्याची माया मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कुणाला लक्ष्मी हवी का लक्ष्मी.... ? चार महिन्यांपूर्वी आढळली होती उकीरड्यावर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

यवतमाळ : आपल्या प्रगतीशील आणि सुसंस्कृत समाजात वेगवेगळ्या प्रवृत्ती वावरत असतात. मुलगी नको मुलगाच हवा, असा हव्यास बाळगणा-या वृत्तीच्या लोकांची संख्या काही कमी नाही. जन्माला आलेल्या मुलीला "नकोशी म्हणून उकिरड्यावर फेकले जाते. अनैतिक संबंधातून जन्मास आलेल्या अर्भकांच्या वाट्यालादेखील उकिरडा येतो. अशीत एक नकोशी चार महिन्यांपूर्वी तलावफैलातील उकिरड्यावर सापडली होती. सुदैवाने तिचे प्राण वाचले, आता तिला नवीन मातापित्यांची प्रतीक्षा आहे.

चार महिन्यांपूर्वी तलावफैलातील उकिरड्यावर स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळून आले होते. शोध घेऊनही तिच्या पालकांचा शोध लागला नाही. अखेर तिला संगोपनासाठी वर्धा येथील शिशूगृहात ठेवण्यात आले आहे. "तेजस्विनी', असे नामकरण करण्यात आले असून, पुनर्वसनासाठी एखाद्या कुटुंबात दत्तक दिले जाणार आहे. त्यामुळे त्या चिमुकलीला लवकरच माता-पित्याची माया मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यवतमाळ शहरातील तलावफैल परिसरात पॅट्रोलिंगवर असलेल्या शहर पोलिस ठाण्याच्या पथकाला निर्जनस्थळी 25 सप्टेंबर 2019 ला स्त्री जातीचे नवजात अर्भक उकिरड्यावर आढळले होते. पोलिसांनी त्या अर्भकाला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.

मुख्याध्यापक विद्यार्थिनीला बोलवायचा एकांतात.... अखेर मिळाला न्याय

संगोपनासाठी शिशूगृहात दाखल
तेथे उपचार करून अर्भकाला जीवदान देण्यात आले. दरम्यान, तेजस्विनी असे नामकरण करण्यात आले. चार महिन्यांच्या कालावधीत सदर नवजात शिशूच्या पालकांचा शोध लागला नाही. कुणीही पालकांबाबत माहितीही दिली नाही, असा अहवाल बाल कल्याण समितीस सादर करण्यात आला होता.

बाल कल्याण समिती यवतमाळच्या चार ऑक्‍टोंबर 2019च्या आदेशानुसार सदर शिशूला वर्धा येथील शिशूगृहात तिचे संगोपन काळजी व संरक्षणाच्या अनुषंगाने प्रवेश देण्यात आला. गेल्या चार महिन्यांपासून या बालिकेच्या कोणतेही जैविक माता-पिता यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे सदर शिशूच्या पुनर्वसनासाठी तिला पर्यायी कुटुंबात दत्तक दिले जाणार आहे. त्याकरिता आठ दिवसांपर्यंत शिशूच्या नातेवाइकांची वाट बघण्यात येईल. त्यानंतर बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार तेजस्विनीला दत्तक विधानाकरिता मुक्त घोषित करण्यात येईल. 

पाणी घेण्यासाठी उतरल्या प्लॅटफॉर्मवर आणि चढताना झाला घात
 

शिशूचे आई-वडील, नातेवाइकांचा शोध घेतला जात आहे. या संदर्भात कोणतीही माहिती मिळाल्यास तसेच दत्तक विधान प्रक्रियेसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता जिल्हा बाल संरक्षण कक्षात संपर्क साधावा.
- देवेंद्र राजूरकर,
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, यवतमाळ.