भाजपने बंडखोरांना दाखविला बाहेरचा रस्ता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

मौदा - नगरपंचायत निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कारवाई करणे व पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध प्रचार-प्रसार केल्याच्या कारणावरून भारतीय जनता पक्षाने मौदा येथील एकनाथ मदनकर व माजी नगरसेविका रिता दिनेश धांडे यांना ६ वर्षांसाठी निलंबित केले आहे.  त्याचप्रमाणे पक्ष्याचे ज्येष्ठ नेते व जिल्हा पदाधिकाऱ्यावर टीकाटिपणी करण्याच्या कारणावरून मोरेश्वर सोरते यांनाही पक्षातून ६ वर्षांकरिता निलंबित करण्यात आले.

भारतीय जनता पक्षाने एकनाथ मदनकर, रिता धांडे आणि मोरेश्वर सोरते यांना मानाचे पद दिले. पक्षात नेहमी सन्मान केला. त्यांनी पक्षांतर्गत विविध पदांचा लाभही घेतला. मदनकर यांना बाजार समिती अध्यक्षपद, पंचायत समिती सदस्यपद व अनेकदा उमेदवारीही दिली. परंतु, नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षांची उमेदवारी न मिळाल्यामुळे ‘भाजप हटाव, मौदा बचाव’ असे सोसलं मीडियावर पोस्टर व्हायरल केले होते. निवडणुकीत भावाच्या सुनेला नगराध्यक्ष उमेदवार म्हणून उभे केले होते. भाजपचा एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही, असे पत्रकार परिषदेत बोलले होते. निवडणूकसुद्धा भाजपच्या विरोधात लढविली.

रिता धांडे यांना मागील निवडणुकीत उमेदवारी देऊन भाजपने नगरसेविकापद व मानसन्मान दिला. तरीही नगपंचायत निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध उमेदवारी घेतली. पक्षाला पराभूत करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले.

मौदा येथील मोरेश्वर सोरते नगरपंचायत निवडणुकीत पराभव झाल्याने पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी व स्थानिक नेते यांच्या विरोधात सातत्याने टीकाटिपणी व विविध माध्यमातून अपप्रचार केल्याच्या कारणावरून जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांच्या आदेशानुसार भाजप नागपूर जिल्हा (ग्रामीण) चे कार्यालयीन मंत्री आनंदराव ठवरे यांनी तिघांना निलंबन पत्र देऊन ६ वर्षांकरिता निलंबित केले.

Web Title: Outdoor road shown by BJP to rebels