Gram Panchayat Elections: 3 हजार मतदान केंद्रांवर लागणार मार्कर्स; आकडा बघून व्हाल थक्क 

Over 6 thousands markers will required for Gram Panchayat Elections voting in Yavatmal
Over 6 thousands markers will required for Gram Panchayat Elections voting in Yavatmal
Updated on

यवतमाळ : जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तीन हजार 92 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या मतदाराच्या हातावर शाई लावण्यासाठी तब्बल सहा हजार मार्कर पेन लागणार आहेत. 

राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर गावागावांत भावी इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. नेत्यांकडून निवडणूक लढण्याची रणनिती आखली जात आहे. तर दुसरीकडे प्रशासनानेही कंबर कसली आहे. निवडणुकीसाठी लागणाऱ्या मशिनपासून ते वाहनांपर्यंतची सर्व व्यवस्था तयार केली जात आहे. यासाठी साहित्यांची गरज निवडणूक विभागाला आहे. त्यामुळेच निवडणुकीसाठी ग्रामपंचायत निवडणूक विभागाने साहित्यांची मागणी केली आहे. 

जिल्ह्यात 980 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात निवडणूक असल्याने प्रशासनही सज्ज झाले आहे. मतदानासाठी निवडणूक विभागाला मशीन सोबतच शाई अत्यंत महत्वाची आहे. मतदारांच्या हातावर शाई लावली जाते. त्यात आता बदल करण्यात आला आहे. शाईऐवजी आता मार्करने मतदारांच्या हातावर रेष ओढली जात आहे. यासाठी निवडणूक विभागाने सहा हजार मार्करची मागणी केली आहे. 

जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतींमधील तीन हजार 72 प्रभाग आहेत. त्यात तीन हजार 92 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. याठिकाणी सहा हजार 186 मार्कर पेन लागणार आहेत. त्यामुळे निवडणूक विभागाने सहा हजार 78 पेनची मागणी केली आहे. इतर साहित्यांसोबतच पेन निवडणूक विभागाला मिळणार आहे.

प्रचारासाठी समाजमाध्यमांवर जोर!
 
ग्रामपंचायत निवडणूक मतदानाच्या तारखा जस-जशा जवळ येत आहेत. तसंतसा प्रचार व प्रसाराच्या कामाला गती आली आहे. कमी वेळात जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर नेते, कार्यकर्त्यांकडून होत आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये सोशल वॉर सुरू झाल्याने सध्या समाजमाध्यमांवर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीतही समाजमाध्यमांचा वापर करायला सुरुवात झाली आहे. पॅनेलकडून व्हिडिओ तयार करून आतापासूनच अपलोड करणे सुरू आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com