पालीवाल समाजाचे रक्षाबंधन हे मानवता एकता दिवसाने साजरे

पंजाबराव ठाकरे
रविवार, 26 ऑगस्ट 2018

आजच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील 23 गावात 1200 च्या वर पालीवाल समाज बंधुनी श्रधांजली अर्पण केल्याची माहिती आहे. रक्षा बंधन साजरा न करता एकता दिवस साजरा केला.

संग्रामपूर (बुलढाणा) - श्रावण पौर्णिमेला देशभरात राखी पौर्णिमा साजरी होते. परंतु देशातील काण्याकोपऱ्यात पसरलेला पालीवाल ब्राह्मण समाज हा दिवस रक्षाबंधन म्हणून साजरा करीत नाही. तर पालीवाल एकता दिवस साजरा करतात. आज सकाळी 9 वाजता देशातील प्रत्येक शहरात जिथे पालीवाल समाज असेल तिथे एकत्र येऊन एका जागेवर आपल्या पूर्वजांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतात.

याच निमित्ताने बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपुर तालुक्यातील वानखेड येथील बालाजी मंदिरात आज 26 ऑगस्टचे सकाळी 9 वाजता पालीवाल समाजातील सर्वांनी एकत्र येऊन त्या वीरगती प्राप्त झालेल्या धौला चौतरा यांना स्मरण करून प्रतिमेचे पूजन मदन पालीवाल यांच्या हातून करण्यात आले. यानंतर पालीवाल समाजातील युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या महापुरुषांच्या जीवनावर येथील मदन पालीवाल व पवन पालीवाल यांनी प्रकाश टाकला.

आजच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील 23 गावात 1200 च्या वर पालीवाल समाज बंधुनी श्रधांजली अर्पण केल्याची माहिती आहे. रक्षा बंधन साजरा न करता एकता दिवस साजरा केला. यावेळी मदन पालीवाल, तुलसीराम पालीवाल, नारायण पालीवाल, हनुमान पालीवाल, गिरीश पालीवाल, घनश्याम पालीवाल, सत्यनारायण पालीवाल, सागर पालीवाल, रितेश पालीवाल, मनीष पालीवाल, टीना पालीवाल,मनोज पालीवाल, नारू पालीवाल, मोहन पालीवाल, डॉ. दीपक पालीवाल, रूपेश पालीवाल, जगदीश पालीवाल, शामू पालीवाल, रामेश्वर पालीवाल, जगन्नाथ पालीवाल आदी समाजातील पुरुष महिला उपस्थित होते.

 

Web Title: Paalival Community Celebrating Manavata Ekta Divas