विस्थापितांची वेदना मांडणारा "लकीर के इस तरफ'

केवल जीवनतारे
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

नागपूर : कुणी घर देता का घर, चार भिंतींचं घर...कुणी शाळा देता का रे, शाळा... कुणी नोकरी देता का रे, नोकरी...ही अवस्था असते विस्थापितांची. मग विदर्भातील गोसेखुर्दचे विस्थापित असोत की नर्मदा धरणाचे. साडेतीन दशकांहून जास्त काळ उलटूनही विस्थापितांच्या पोटात सुखाचे चार घास पडले नाहीत. या व्यथांची कथा सांगणारा "लकीर के इस तरफ' हा "सिनेपट' येतोय.

""विकास तर हवा परंतु शहरांना सुरळीत पाणीपुरवठाही हवा. साधे नागपूरचे उदाहरण घेतल्यास पूर्वी प्रत्येक पन्नास मीटरवर घरी विहिरी होत्या. पातळी खोल गेली. नंतर अंबाझरी तलावातून पाणीपुरवठा होत असे. नंतर गोरेवाडा पुढे पेंच प्रकल्प आणि आता तोतलाडोह धरणातून पाणीपुरवठा होतो. आता पाणी पन्नास मीटरपासून पन्नास किलोमीटर अंतरावर गेलं आहे. यासारख्या अनेक प्रश्‍नांची नर्मदा आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर उकल करणारा "लकीर के इस तरफ' हा "सिनेपट' आहे, अशी माहिती पर्यावरणतज्ज्ञ अतुल प्राजक्ता यांनी दिली.
विस्थापितांच्या वेदना दूर करण्यासाठी दाखविलेली सारीच स्वप्ने उद्‌ध्वस्त झाली. विस्थापितांचे जगणेच मुश्‍कील झाले. त्यांच्या चेहऱ्याची रया गेलेली. जमिनी गेल्याने मोलमजुरी करून ते जगतात. नर्मदा धरणाच्या विस्थापितांची वेदना तर अधिकच खोल आहे. ती मांडणारा हा "सिनेपट' आहे. शिल्पा बल्लाळ यांचे दिग्दर्शन आणि निर्मिती आहे. नदी अडवून मोठमोठी धरणे बांधून विकासाचा देखावा उभा केला जातो. मात्र यात जमीन नापीक होते. घरे जातात, शेती, मासेमारी करणाऱ्यांचे व्यवसाय बुडतात. हीच अवस्था 1995 सालापासून नर्मदा धरणामुळे येथील आदिवासींची झाली असून त्यांची संस्कृतीच उद्‌ध्वस्त झाली आहे. या उद्‌ध्वस्त झालेल्यांचा लढा मेधा पाटकर यांनी "नर्मदा बचाव' आंदोलनातून उभा केला. याचे जिवंत चित्रण यातून पुढे आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The pain of displacement