पणन महासंघाचा कापूस खरेदीचा मुहूर्त वारंवार का बदलतोय?

रूपेश खैरी
Tuesday, 17 November 2020

केंद्र जाहीर करताना पणन महासंघाकडून दिवाळीनंतर खरेदी सुरू करण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली होती. यानंतर 22 नोव्हेंबरचा मुहूर्त ठरला. पण पणनमंत्री कामात व्यग्र असल्याने हा मुहूर्त तूर्तास टळला. यामुळे आता 1 डिसेंबरचा नवा मुहूर्त ठरविण्यात आला आहे. पण तोही साधला जाणार की टळणार हे वेळच सांगणार आहे. 

वर्धा : कापूस उत्पादकांना हमीभाव मिळण्यासाठी शासकीय खरेदी केंद्राची गरज आहे. यामुळे सीसीआय आणि कापूस पणन महासंघाच्या खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. असे असताना केवळ पणनमंत्र्यांच्या व्यग्रतेमुळे कापूस पणन महासंघाचा खरेदीचा मुहूर्त बदलत असल्याचे दिसून आले आहे. पूर्वी २२ नोव्हेंबर तारीख ठरली होती. आता मात्र एक डिसेंबरचा मुहूर्त ठरविण्यात आला आहे. 

हेही वाचा - आपल्या मादीला आकर्षित करण्यासाठी तयार करतात सुंदर घरटं...

दिवाळी झाली. सीसीआयकडून कापूस खरेदीचा दिवाळीपूर्वीच मुहूर्त झाला. पण पूर्ण केंद्र सुरू झाले नसल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पणन महासंघाच्या खरेदीची प्रतीक्षा आहे. केंद्र जाहीर करताना पणन महासंघाकडून दिवाळीनंतर खरेदी सुरू करण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली होती. यानंतर 22 नोव्हेंबरचा मुहूर्त ठरला. पण पणनमंत्री कामात व्यग्र असल्याने हा मुहूर्त तूर्तास टळला. यामुळे आता 1 डिसेंबरचा नवा मुहूर्त ठरविण्यात आला आहे. पण तोही साधला जाणार की टळणार हे वेळच सांगणार आहे. 

हेही वाचा - मुलांमुळे आई-वडिलांना अनुभवता आला विवाह सोहळा; आयुष्याच्या सायंकाळी दाम्पत्य चढले...

कापूस पणन महासंघाकडून राज्यात 30 केंद्र सुरू करण्याचे जाहीर केले. या केंद्रामुळे किमान त्या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. गत वर्षी 192 केंद्र सुरू करणाऱ्या पणन महसंघाकडून यंदा कर्मचारी आणि आपली क्षमता पाहून केवळ 30 केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण या केंद्रावर खरेदीचा मुहूर्त झाला नाही. यामुळे अनेक कापूस उत्पादकांची चिंता वाढली आहे. 

हेही वाचा - झोपड्याजवळून येत होती दुर्गंधी; पोते उघडले असता आढळला युवतीचा मृतदेह, बलात्कार करून...

सीसीआयचे पूर्ण केंद्र नाही - 
सीसीआयने कापूस खरेदी केली. पण त्यांचे पूर्ण केंद्र सुरू झाले नाही. वर्ध्यात सीसीआय सहा केंद्रांवरून खरेदी करणार आहे. वास्तवात केवळ देवळी येथील एकाच केंद्रावर खरेदी सुरू झाली आहे. यामुळे नियमानुसार नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. इतर केंद्र तत्काळ सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. 

कापूस पणन महासंघाची खरेदी लवकरच सुरू होणार आहे. काही अडचणी असल्याने तारीख बदली आहे. येत्या महिन्यात जाहीर केलेल्या केंद्रावर कापूस खरेदी सुरू होईल. 
- राजाभाऊ देशमुख, अध्यक्ष, कापूस पणन महासंघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: panan mahasangh announce new date for cotton selling in wardha