पंचमढी "नागद्वार यात्रा' यंदा स्थगित

file photo
file photo

सौंसर  : पाऊसच पडला नसल्याने श्रावण महिन्यात भरणारी पंचमढी येथील नागद्वार स्वामी यात्रा यंदा होशंगाबाद जिल्हा प्रशासनाने तात्पुरती स्थगित केली आहे. यात्रेदरम्यान खाद्यान्न व साहित्य वाटपासाठी संपूर्ण राज्यातून दाखल झालेले ट्रक तसेच गाड्याही पंचमढी येथेच थांबवून ठेवण्यात आल्या आहेत. येत्या आठवड्यात चांगला पाऊस पडला, तरच ही यात्रा करता येणार आहे. 25 जुलैपासून नागद्वार स्वामी यात्रेला सुरुवात होणार होती. मात्र, महिनाभरापासून या भागात पाऊस पडला नाही. सर्वत्र टंचाईची परिस्थिती आहे. यात्रेला विदर्भासह विविध राज्यांतून लाखो भक्त येतात. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी यात्रा स्थगित करण्यात आली आहे. चांगला पाऊस पडल्यानंतर यात्रेची तारीख ठरविण्यात येणार असल्याची माहिती महादेव मेला समितीने दिली आहे. नागपंचमीच्या निमित्ताने पचमढीच्या सातपुडा पवर्तरांगांच्या टेकड्यांमधील दुर्गमस्थानी असलेल्या श्रद्धास्थानी नागद्वारस्वामी यात्रा नागपंचमीनिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येते. 15 किमी अंतराच्या या यात्रेत भाविकांना अनेक टेकड्या व पहाड चढावे लागतात. येथे पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत पावासावर निर्भर आहे. यामुळे होशंगाबादचे जिल्हाधिकारी शीलेंद्र सिंह व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्यप्रताप सिंग यांच्यासह अधिकाऱ्यांनी पंचमढी यात्रेचा आढावा घेतला. पहाड व दुर्गम भागात भाविकांच्या मुक्कामस्थळी सर्वांना पाणीपुरवठा करणे अशक्‍य आहे. यात्रामार्गातही भाविकांना पाणी न मिळाल्यास आजार पसरण्याची शक्‍यता आहे, असे यात्रेचे नियोजन करणारे वरिष्ठ अधिकारी मदनसिंग रघुवंशी यांनी सांगितले.

मंडळांना पचमढीतच थांबविलेनागपूर येथील नागद्वार सेवामंडळाच्या माध्यामातून भाविकांना यात्रेत अनेक सुविधा पुरविल्या जातात. नागपुरातून भंडारा व इतर सेवा साहित्य घेऊन पोहोचलेल्या मंडळांना व पंचमढी येथेच थांबविण्यात आले आहे. यात्रेच्या तीन दिवसांपूर्वी मंडळांना टेकड्यांवर जाण्याची परवानगी दिली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com