वाॅलमार्टव्दारे फ्लिपकार्ट खरेदीचा ग्राहक पंचायतीचा विरोध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

अकोला : अमेरिकेन कंपनीने फ्लिपकार्ट कंपनीचे ७० टक्के शेअर्स खरेदी केल्यामुळे नफा अमेरिकेत आणि रोजगार चीनमध्ये जाणार आहे. याचा भारतातील किरकोळ व्यापार आणि रोजगारावर विपरीत परिणाम होऊन प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे.

चीनी माल व्यापक प्रमाणात भारतीय बाजार पेठ काबीज करणार आहे. वाॅलमार्ट आणि अॅमेझाॅनची एकाधिकारशाही निर्माण होऊन मनमानी किंमतीत चीनी माल विकून ग्राहकांची लूट होणार आहे. या सर्व प्रकारांनी भारतीय व्यापार आणि आर्थिक प्रभावित होऊन अंतिमतः भारतीय ग्राहकांचे नुकसान होणार आहे. म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत भारतीय ग्राहकांचे नुकसान करण्याऱ्या व्यवहाराचा विरोध करीत आहे. 

याबाबतचे सविस्तर लेखी निवेदन अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या अकोला जिल्हा शाखेतर्फे माननीय पंतप्रधानांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले. याप्रसंगी जयप्रकाश पाटील, हेमंत जकाते, मनोहर गंगाखेडकर, रामराव बोधनकर, अनिल कोल्हटकर, मनोज अग्रवाल,सुनील नारखेडे, दीपक गावंडे, अॅड.श्रीपाद कुलकर्णी, डाॅक्टर अशोक ओळंबे-पाटील, सखाराम मुळे आणि प्रमोद बोरकर इत्यादी वरिष्ठ पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

Web Title: Panchayat opposed to buying with wallmart Flipkart