'पंचायत समिती सदस्यांना विकास निधी द्या'

नंदकिशोर वैरागडे 
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

या बैठकीमध्ये पंचायत  समिती सदस्यांच्या बैठक भत्ता कमीत कमी 1000 रुपये देन्यात यावे, क्षेत्रात फिरण्यासाठी कमीत कमी 5000 रुपये प्रवास भत्ता द्यावे, जिल्हा नियोजन समितीत 5  पंचायत समिती सदस्यांना घेण्यात यावे, स्थानिक स्वराज्य संस्था व विधानपरिषदेच्या निवडणुकीत पंचायत समिती सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा, कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रत्येक पंचायत समिती मधुन एका सदस्यांना घेण्यात यावे, गणातील विकासकामांसाठी 50 लक्ष रुपये वार्षिक देण्यात यावे.

कोरची : पंचायत समिती सदस्याच्या विविध समस्या बाबत गडचिरोली प्रेस क्लब येथे जिल्हयातील पंचायत समिती सदस्यांची बैठक चामोशीँ पं. स. चे सभापती आनंदभाऊ भांडेकर यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. 

या बैठकीमध्ये पंचायत  समिती सदस्यांच्या बैठक भत्ता कमीत कमी 1000 रुपये देन्यात यावे, क्षेत्रात फिरण्यासाठी कमीत कमी 5000 रुपये प्रवास भत्ता द्यावे, जिल्हा नियोजन समितीत 5  पंचायत समिती सदस्यांना घेण्यात यावे, स्थानिक स्वराज्य संस्था व विधानपरिषदेच्या निवडणुकीत पंचायत समिती सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा, कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रत्येक पंचायत समिती मधुन एका सदस्यांना घेण्यात यावे, गणातील विकासकामांसाठी 50 लक्ष रुपये वार्षिक देण्यात यावे. सभापती यांना 20000 रुपये मानधन, तर उपसभापती यांना 15000 रुपये मानधन देण्यात यावे , सभापती व उपसभापती यांना तालुक्यात दौरे करण्यासाठी वाहन देण्यात यावे. 5 घरकुलाचा कोटा प्रती सदस्यांना देण्यात यावा, आदी ठराव एकमताने मंजुर करण्यात आले आणी शासनाने आमच्या मागण्या मंजुर न केल्यास सवँ सदस्य मोठा आंदोलन करण्याचा व वेळेप्रसंगी सामुहिक राजीनामे देण्याचा इशारा सुध्दा शासनाला देण्यात आला. 

यावेळी आ. डाँ. देवराव होळी यांनी अचानक भेट देवुन सदस्याच्या भावना जाणुन एक शिष्टमंडळ मुंबयी येथे मा. मुख्यमंत्री यांचेकडे 27 सप्टेंबरला भेट घेवुन मागँ काढण्याचे आश्वासन दिले.

या बैठकिला अजमन राऊत पं. स. सभापती, धानोरा, मनमोहन गायकवाड पं. स. सभापती वडसा, दुलँभाताई बांबोळे पं. स. सभापती गडचिरोली, सुवणाँताई येमुलवार पं. स. सभापती मुलचेरा, बबीताताई उसेंडी पं. स. सभापती आरमोरी, बेबीताई लेकामी पं. स. सभापती एटापल्ली, गिरीधर तितराम पं. स. सभापती कुरखेडा, सुरेखाताई अलाम पं. स. सभापती अहेरी, कचरीताई काटेंगे पं. स. सभापती कोरची, सुकराम मडावी पं. स. सभापती भामरागड,  यांचे सह सवँ पं. स. चे उपसभापती व सवँ सदस्य उपस्थित होते. 

प्रास्ताविक  गडचिरोली पं. स. चे उपसभापती विलास केशवराव दशमुखे यांनी केले तर संचलन व आभार पं. स. सदस्य नेताजी गावतूरे यांनी मानले

Web Title: panchayat samiti member in korchi