गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

शेगाव (जि. बुलडाणा) - श्री संत गजानन महाराजांची पालखी मंगळवारी सकाळी सात वाजता टाळकरी, पताकाधारी, अश्व, गजासह पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. या पालखीत गजानन महाराजांचा चांदीचा मुखवटा आहे. राजवैभवी थाटात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीच्या नयनरम्य सोहळ्यात टाळकरी, पताकाधारी सहभागी झाले आहेत. 600 वारकऱ्यांचा पालखीत सहभाग आहे.

शेगावच्या संत गजानन महाराज संस्थानाचा यंदा 51 वा पालखी सोहळा आहे. व्यवस्थापकीय संचालक कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या हस्ते गजानन महाराजांचा मुखवटा फुलांनी सजविलेल्या पालखीत स्थापन करण्यात आला. या वेळी "गण गणात बोते'च्या गजरात भाविकांनी जयघोष केला. वारकऱ्यांच्या सेवेसाठी संस्थानचे सेवेकरीसुद्धा पालखीसोबत आहेत. आरोग्य सुविधेसाठी डॉक्‍टर आणि औषधोपचाराने सज्ज रुग्णवाहिका तैनात आहे.

हजारो भाविकांनी दिला निरोप
गजानन महाराजांच्या पालखीला निरोप देण्यासाठी हजारो भाविक शेगावच्या सीमेपर्यंत पालखीलासोबत चालत गेले. एक महिन्यानंतर 18 जुलै रोजी पालखी पंढरपूरला पोहोचणार आहे. या ठिकाणी 25 जुलैपर्यंत पालखीचा मुक्काम राहणार असून, त्यानंतर पुन्हा 7 ऑगस्ट रोजी शेगावसाठी परतीचा प्रवास सुरू होईल.

Web Title: Pandharpur Wari 2018 Palkhi Wari Timetable Gajanan Maharaj Palkhi