शिवारात दिसला बिबट अन् गावात पसरली दहशत

bibat
bibat

अकोला : तालुक्यातील यावलखेड शेतशिवारात गेलेल्या तीन युवकांना बिबट्यासारखा प्राणी दिसल्याने त्यांनी गावाकडे धाव घेत माहिती दिली. यामुळे यावलखेडसह परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेताकडे जाण्याचे टाळत इतरांनाही न जाण्याचा सल्ला दिला आहे.


क्लिक करा - रात्री अचानक कोसळली तीन मजली इमारत
शेतकऱ्यांचा सुरक्षतेचा प्रश्‍न ऐरणीवर
गत आठ दिवसांपासून यावलखेड, बोंदरखेड शिवारात बिबट्या दिसल्याची चर्चा परिसरातील गावांमध्ये सुरू आहे. यावलखेड येथील तीन युवक यावलखेड शेतशिवारात गेले असता, त्यांना बिबट्या दिसला असल्याचे त्यांनी सांगितले. हि माहिती गावांमध्ये पसरताच गावातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. शेतामध्ये रब्बी हंगामाची कामे सुरू असून वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी रात्री पहारा देण्यास जातात परंतु, परिसरात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांच्याच सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी हा बिबट्या बोंदरखेड शिवारात रेल्वे रुळाजवळून जात असल्याचे एका रेल्वे इंजीनच्या चालकाने सांगितले होते.


हेही वाचा - वर्षाच्या सुरुवातीला पावसाचा तडाखा
शेतामध्ये जाण्याचे टाळत आहेत
परिसरात वन्य प्राण्याचा चांगलाच वावर असल्याचे स्पष्ट होत आहे. अन्नाच्या शोधात हा बिबट्या नागरी वस्तीकडे आला असल्याचे अनेकांचे मत आहे. दरम्यान, बिबट्याचे दर्शन झाल्याने यावलखेड, बोंदरखेडसह परिसरातील आदी गावच्या नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. बिबट्याची दहशत निर्माण झाल्याने शेतकरी शेतामध्ये जाण्याचे टाळत आहेत.


वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा
शेतामध्ये सध्या रब्बी हंगामाची लगबग सुरू आहे. अनेक शेतामध्ये तूर, हरभरा पिकांची झाडे आहे. या पिकांच्या संरक्षणासाठी शेतकरी रात्री शेतामध्ये पहारा देतात. शेतामध्ये हिंसक प्राण्यांचा वावर वाढला असल्याने शेतकऱ्यांची सुरक्षा हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. शेतामध्ये रानडूकर, हरिणीसारख्या वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला आहे. शेतामध्ये नाही गेले तर वन्यप्राणी पिके फस्त करतात. यामुळे वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोस्त करून भयमुक्त करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com